Accidental death of a youth in Nagpur district 
नागपूर

ती ठरली यशच्या आयुष्यातील अखेरची पार्टी, ढाब्यावरून परतताना घडला थरार...

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा (जि. नागपूर) : मित्रांसोबत धाब्यावर जेवायला जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. अपघात होऊन गाडी उलटल्याने यश राजेंद्र राहाटे (वय 22, रा. गोपालनगर, नागपूर) या युवकाचा मृत्यू झाला. तर दोन मुली गंभीर जखमी आहेत. अन्य चौघांनाही चांगलाच मार लागला आहे. सर्व युवक एकमेकांचे मित्र असून ते शहरातील रहिवासी आहेत. 

प्राप्त माहितीनुसार, ही घटना 28 फेब्रुवारीला मध्यरात्री घडली. नागपूर येथील युवक व युवती जिप्सी गाडीने जेवणासाठी वर्धा रोडवरील एमसीसीपी फूड ढाबा येथे गेले होते. यात 22 ते 24 वयोगटातील दोन तरुणी व पाच तरुण होते. घरी परतताना गौसी मानापूर शिवारात जिप्सीवरील नियंत्रण सुटल्याने जिप्सी पलटली. यात यश राजेंद्र राहाटे हा गंभीर जखमी झाला. त्याला वर्धा रोडवरील कल्पवृक्ष हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्‍टरने मृत घोषित केले. 

काही युवक किरकोळ जखमी झाले. यात अविनाश अय्यर (वय 24, रा. विनायकनगर नागपूर), आनंद गायधने (वय 24, रा. गोपालनगर नागपूर), अंकित तुपकर (वय 24, रा. वर्धमाननगर नागपूर), हर्षल ठवरे (वय 24, रा. मानेवाडा नागपूर), मोहिनी माहूरकर (वय 24, रा. नीरी कॉलनी, लक्ष्मीनगर, नागपूर), शिवानी गिरीपुंजे (वय 24, रा. छत्रपती चौक नागपूर) यांचा समावेश आहे. त्यांना नजीकच्या विवेकानंद हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

हर्षल ठवरे जिप्सी चालवत होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक सरीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद घिये करीत आहेत. अपघातात मृत पावलेला यश याचे वडील राजेंद्र राहाटे महापालिकेत अभियंता म्हणून कार्यरत आहे. तरुण मुलगा गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT