file image canva
नागपूर

पोलिसाच्या घराला आग लावणारे फरार, सीसीटीव्हीतील ते दोघे कोण?

अनिल कांबळे

नागपूर : पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी आणि दोन मुलांना घरात कोंडून घरावर रॉकेल ओतून पेटवून देत जीवे मारण्याच्‍या प्रयत्न केल्याच्या घटनेत अद्याप पोलिसांना कोणताही धागा गवसला नाही. त्यामुळे ही घटना घडण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या प्रकरणी दोन व्यक्तीवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण हे नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत असून ते वानाडोंगरीतील आयटीआय कोव्हिड सेंटरला तैनात आहेत. ते एसआरपीएफ कॅम्पजवळील ज्ञानदीप कॉलनीलगतच्या सप्तकनगर पत्नी पूनम, मुलगा राघव (६) आणि केशव (३) यांच्यासह राहतात. मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात दोन आरोपींनी राहुल यांच्या घरावर रॉकेल ओतले आणि आग लावली. त्यावेळी घरात राहुलची पत्नी पूनम आणि दोन्ही मुले होते. घरात धूर दाटल्यामुळे पूनम या झोपेतून जागा झाल्या. त्यांनी समयसूचकता दाखवत दोन्ही मुलांना बेडरूममधून काढून किचनमध्ये आणले. मामाला फोन करून स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न केला. मामाने दार तोडून तिघांनाही बाहेर काढले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला. शेजारी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज जप्त केले. दोन आरोपी घराच्या दरवाज्यातून रॉकेल ओतून आग लावताना दिसत आहेत. त्या दोघांची ओळख पटविण्याचे काम पोलिस करीत आहेत.

हेही वाचा - हुर्रे..! परीक्षा न देताच पास, पण खासगी शाळांकडून शुल्कासाठी परीक्षेचं निमित्त

भांडणातून वचपा काढण्याचा प्रयत्न

राहुलचे पहिल्या पत्नीसोबत नेहमी खटके उडत होते. वादावादीतून राहुलने पहिल्या पत्नीपासून २०११ मध्ये घटस्फोट घेतला होता. त्याही दिशेने पोलिस तपास करीत आहेत. तसेच राहुल भांडखोर स्वभावाचा असल्यामुळे त्याचा अनेकांशी वाद झाला आहे. त्यामुळे कुणी भांडणातून वचपा काढण्याचा प्रयत्न केला का? याचाही तपास पोलिस करीत आहेत. पूनम यांनी ३-४ संशयितांची नावे सांगितली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ : हार्दिकचा पत्ता कट करायला, मुंबईचा २३ वर्षीय ऑल राऊंडर येतोय; न्यूझीलंड दौऱ्यासाठी वन डे संघात निवडीची जोरदार चर्चा...

SPPU Campus Agitation Row : पुणे विद्यापीठात आंदोलने, मोर्चे आणि निदर्शनांवर बंदी! व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयावरून विद्यार्थी संघटना आक्रमक

Maharashtra Live News : कोल्हापुरात शेतकऱ्यांचा चक्काजाम; साखरेचा एक कणही बाहेर पडू देणार नाही : राजू शेट्टी

Kolhapur Water Crisis : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य! धरणांमधील 10 टक्के पाणी राखून ठेवा; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे महत्त्वाचे आदेश

WhatsApp चे नवीन धमाकेदार फीचर! आता 10 मिनिटांपासून 14 दिवसांपर्यंत आधीच शेड्यूल करा मेसेज, फोटो अन् व्हिडिओ...

SCROLL FOR NEXT