vegetables prices increasing sakal
नागपूर

Nagpur : महंगाई मार गई ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेतच गेली नऊ वर्षे

महागाईचा आगडोंब; सामान्यांनी जगायचं कसं?

सकाळ डिजिटल टीम

नागपूर ता: टोमॅटोसह इतर भाज्या, खाद्य तेल, डाळीनंतर आता तांदुळ, साखरेसह जीऱ्याच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. महागाई आपल्या रंगाची उधळण करीत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच खाद्यान्नाच्या किमती आकाशाला भिडल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे ‘महंगाई मार गई’ अशी सध्याची अवस्था सामान्यांची झाली आहे.

काही राज्यात अति पाऊस तर कुठे पावसाने दडी मारल्याने पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. परिणामी, खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून कच्च्या मालाचेही भाव वाढले आहेत. बॅंकेच्या गृह कर्जाच्या व्याजाच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दररोजचा खर्चही भागवणे कठीण झाले आहे. मजुरांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वंच जण वाढलेल्या भाववाढीने हवालदिल झाले आहेत.

वस्तू - दोन महिन्यांपूर्वीचे दर - आजचे दर

  • साखर -३८ - ४२

  • तांदूळ -४३ - ४७

  • तूरडाळ -१२० - १४०

  • सोयाबीन तेल -१०५ - ११५

  • जिरे -६५० - ८५०

गॅस सिलिंडरच्या किमती आवाक्याबाहेर

नऊ वर्षापूर्वी गॅस सिलिंडर ३२५ ते ३५० रुपयात मिळत होते. त्यानंतर अनुदानाचे सूत्र आले. मात्र, आता अनुदानित सिलिंडरसाठी ११५४.५० रुपये मोजावे लागत आहे. ही विक्रमी भाववाढ आहे. यापोटी ग्राहकांना फक्त ४० ते ५० रुपये अनुदान देण्यात येत आहे.

तूरडाळ गाठणार २०० चा दर

तूरडाळीचे दर दोन महिन्यापूर्वी ११० रुपये प्रति किलो होते. अचानकच मोठ्या कंपन्यांनी साठवणुकीसाठी तुरीची खरेदी करण्यास सुरवात केली. त्यामुळे तूरडाळ प्रति किलो १४० ते १४५ रुपयावर गेली आहे. ही स्थिती अशीच राहिली तर येत्या काही दिवसात तूरडाळ २०० रुपये किलोवर जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

साखरेसह इतरही खाद्य वस्तूंचे भाव वाढलेले असताना जिरे, बदाम, सोप, ओवा, मेथीच्या दरातही वाढ झालेली आहे. वाढलेल्या दरामुळे ग्राहकांनी खरेदीवर बंधने आणली आहेत. याचा फटका व्यापारालाही बसू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Politics Jilha Bank : वाळव्याच्या गब्बरसिंगाने सावध राहावे, सदाभाऊ खोतांचा जयंत पाटलांना टोला; ‘अलीबाबाच्या गुहेत गोपीचंद पडळकररूपी वाघाची एन्ट्री’

Maharashtra Police: ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल; तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ, दोघांच्या बदल्या

राज्याच्या पोलीस दलात मोठे बदल, आयपीएस अधिकाऱ्यांसह १९ जणांच्या बदल्या

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्हा बँकेत शिंदेंच्या आमदाराला धक्का, मुलाचा अर्ज बाद

पुण्यात FDA ची मोठी कारवाई! दिवाळीच्या फराळात रंगाचा वापर; कोंढव्यात 1,190 किलो लाडू जप्त

SCROLL FOR NEXT