Action being taken for black marketing grocery 
नागपूर

सावधान! धान्याचा काळाबाजार करताय? होऊ शकते कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शासनाकडून गरजूंना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. परंतु काही स्वस्त धान्य दुकानदारांकडून काळाबाजार करण्यात येत आहे. अशा दुकानदारांच्या विरोधात अन्न पुरवठा विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून तीन दुकानांचे परवाने रद्द केले आहेत.

नागपुरात कोरोनाचे रुग्ण आहेत. शेकडो लोकांना क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले असल्यामुळे गरिबांची अडचण होत आहे. केवळ जीवनावश्‍यक वस्तुंची दुकानेच उघडी ठेवली जात आहेत.परिणामी, हातावर पोट असणाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अन्न पुरवठा विभागावर मोठी जबाबदारी आली आहे. जिल्ह्यात लाखावर शिधापत्रिकाधारक आहेत. चालू महिन्यात 97 टक्के ग्रामीण नागरिकांनी रेशनचे धान्य उचलले असून शहरी भागातील 95 टक्के नागरिकांना पुरवठा झाल्याचे सांगण्यात येते. मात्र काही रेशनदुकानदारांकडून याचा फायदा घेत नागरिकांना कमी धान्य देत त्याचा काळाबाजार करण्यात येत आहे. अशा दुकानदारांविरूद्ध कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. चिचभवन-गोंडखैरी, सावनेर तालुक्‍यातील सिल्लेवाडा येथील दुकानदारावर गुन्हा दाखल केला. तर कामठी तालुक्‍यातील येरखेडा येथील एका दुकानदाराचा समावेश आहे. या तिन्ही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून काळाबाजार करणाऱ्यांना सोडण्यात येणार नाही, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी दिली.

केशरी कार्ड धारकांना धान्य

अंत्योदय व प्राधान्य गटासोबत केशरी कार्ड धारकांनाही धान्य मिळणार आहे. हे धान्य मे आणि जून या दोन महिन्याचे धान्य मिळणार आहे. चालू महिन्याचे धान्य वितरण जवळपास आटोपले असून मे महिन्याचे धान्य दुकानांमध्ये पोहोचले आहे. येत्या सोमवारपासून वाटप सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भाष्कर तायडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT