affidavit of the state government in the high court about home guard payment  
नागपूर

होमगार्डला पोलिसांइतके वेतन शक्य नाही, राज्य शासनाचे उच्च न्यायालयात शपथपत्र

केतन पळसकर

नागपूर : कोरोनाकाळ असल्याने होमगार्डना सातव्या वेतन आयोगानुसार पोलिस कॉन्स्टेबलच्या समकक्ष वेतन देऊ शकत नाही, अशा आशयाचे शपथपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य शासनाने दाखल केले. होमगार्ड विकास समितीने वेतनवाढीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात १० डिसेंबर २०१९ रोजी उच्च न्यायालयाने सहाव्या वेतन आयोगानुसार होमगार्डना पोलिस कॉन्स्टेबलच्या वेतनाइतके वेतन देण्याचे आदेश दिले होते. शासनाने या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप करीत होमगार्ड विकास समितीने उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली. 

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य शासनाने उत्तर दाखल केले. यामध्ये सध्या कोरोना संसर्गामुळे उद्‍भवणाऱ्या परिस्थितीत होमगार्डना इतका पगार देणे शक्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. २६ ऑगस्ट २०२० रोजीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. तसेच या निर्णयाची माहिती होमगार्ड कमांडंट जनरल यांना १६ सप्टेंबर २०२० रोजीच देण्यात आली होती. राज्य सरकारने यासंदर्भात उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. या शपथपत्राच्या आधारावर न्यायालयाने हे मान्य केले आहे की, राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा अवमान केलेला नाही. वेतनवृद्धीच्या मुद्द्यावर याचिकाकर्ता होमगार्ड विकास समिती नियमानुसार कायदेशीर मदत घेऊ शकते. 

डिसेंबर २०१९ मध्ये नागपूर खंडपीठाने राज्याचे गृह मंत्रालय आणि होमगार्डच्या कमांडंट जनरल यांना होमगार्डना वेतनवृद्धी देण्यावर सहा महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. हे वेतन सातव्या आयोगानुसार असावे व ते पोलिसांच्या समकक्ष असावे, अशी मागणी त्यांनी केली होती. याचिकाकर्त्यानुसार होमगार्ड पोलिसांच्या सगळ्याच जबाबदाऱ्या सांभाळतात. त्यामुळे त्यांनाही हवालदारांच्या समकक्ष वेतन मिळावे, अशी मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली आहे. मात्र, न्यायालयाने दिलेला कालावधी शासनाने वेळोवेळी वाढवून मागितला. तसेच आदेशानुसार अद्याप वेतन दिले नाही, अशी बाजू अवमानना याचिकेत संस्थेने मांडली आहे. विशेष सरकारी वकील गिरीश कुंटे यांनी सरकारतर्फे, तर याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ विधिज्ञ मृगेंद्र सिंग यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्या समक्ष सुनावणी झाली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत पुन्हा विमान अपघात, रेडबर्डची अपघाताची परंपरा; DGCA घातलेली बंदी

Whatsapp Plus : आता व्हॉट्सॲप वापरण्यासाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे; दरमहा शेकडो नवे फीचर्स, युजर्स झाले थक्क

Latest Marathi News Live Update : मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी चार लाख मदतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा

Chitrakoot Travel: फॉरेनला जाण्याची गरज नाही ! उन्हाळी सुट्टीत भेट द्या विंध्य पर्वतरांगांना, कमी बजेटमध्ये अनोखे सौन्दर्य

River Accident: नदी ओलांडताना बळीराजासह सर्जाराजा बुडाले; आव्हाणा-खेडी शिवारातील घटना, निष्पापांचा गेला बळी, तीन तासांचा थरार..

SCROLL FOR NEXT