Revolutionary Cancer Diagnosis Infrastructure in Nagpur: मध्यभारतात तोंडाच्या कर्करोगाची राजधानी अशी नागपूरची ओळख आहे. यामुळेच नागपूरच्या सभोवताल सुसज्ज अशा कर्करोगावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे जाळे विणले गेले आहे. हीच बाब लक्षात घेत कर्करोगाच्या उंबरठ्यावरील रुग्णांच्या जीवघेण्या आजाराचे निदान आणि उपचार एकाच वेळी होतील, अशा रेडिओ सायक्लोटॉन प्रकल्पाची निर्मिती उपराजधानीत होणार आहे.
कर्करोगाच्या उपचाराची दिशा ठरविण्यासाठी पेटस्कॅनद्वारे निदान आवश्यक आहे. नागपुरात एकाही शासकीय रुग्णालयांत, मध्यवर्ती उपचार केंद्रात ही निदान यंत्रणा नाही. यामुळे यासंभाव्य जीवघेण्या आजाराचे निदान सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत सायक्लोटॉन प्रकल्पाच्या धर्तीवर मध्य भारतातील पहिला सायक्लोटॉन प्रकल्प नागपुरात सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह ९ सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
या समितीमध्ये एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, व्हीएनआयटीचे संचालक, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. आनंद पाठक, संचालक शैलेश जोगळेकर यांचा या समितीत समावेश आहे. दिल्ली येथील केंद्रिय अणुऊर्जा मंत्रालयाच्या परवानगीनंतरच हा प्रकल्प सुरू होईल.
प्रारंभी पेटस्कॅनद्वारे कर्करोगाच्या निदानासाठी रेडिओ आयसोटोप तयार करावा लागतो. रेडिओ डायग्नोस्टिकसाठी याचे शास्त्रीय विघटन करावे लागते. अणूचे उत्सर्जन होऊ नये, यासाठी अत्यंत काटेकोर आणि शास्त्रीय पद्धतीने ही प्रक्रिया करावी लागते. मध्य भारताच्या दुर्गम भागातील कर्करुग्णांसाठी निदान आणि उपचार करणारी सायक्लोटॉन यंत्रणा वरदान ठरणार आहे. तसेच सध्या पेटस्कॅन या कर्करोगाच्या निदानासाठी होणारा खर्च निम्यावर येईल.
मुंबईतील टाटा मेमोरियलनंतर राज्यात कुठेही सायक्लोटॉन प्रकल्प नाही. त्यामुळे पाचशे किलोमीटरच्या परिघात नागपूर येथे प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी गठित समितीने एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोलकाता येथील सायक्लोटॉन प्रकल्पाला भेट दिली. शास्त्रीयदृष्ट्या येथील प्रकल्पाचा अभ्यास केला. त्याच धर्तीवर नागपुरात हा प्रकल्प साकारला जाणार आहे. निकषानुसारच जागेची निवड करून २० एकर परिसरात हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.
- २५० कोटींचा अंदाजे खर्च
- २० एकर जागेवर प्रकल्प
- शहराबाहेरच उभारावा लागेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.