Nitin Gadkari Threat Calls afzal pasha esakal
नागपूर

Nitin Gadkari Threat Calls : गडकरींना धमकी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार 'पाशा'ने बांग्लादेशमध्ये घेतलेलं दहशतवादाचे ट्रेनिंग

चौकशीसाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी नागपुरात दाखल

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मुळचा बंगरुळू येथील असलेला अफसर पाशा याने बांग्लादेश येथे जाऊन ‘जमात’ चे प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रशिक्षणाच्या आधारावर त्याने दहशतवादी कारवाया घडवून आणल्याची माहिती आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोनदा फोन करीत, धमकी देऊन १०० कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणी जयेश पुजारी उर्फ कांता याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्या चौकशीतून पोलिसांना त्याच्यासोबत बेळगाव कारागृहात असलेला ‘पीएफआय’चा सचिव आणि दहशतवादी अफसर पाशा यानेच, त्याचे मतपरिवर्तन करीत, त्याला खंडणी मागण्यासाठी प्रवृत्त केले.

त्यामुळे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या पाशाला चौकशीसाठी नागपूर पोलिसांनी नागपुरात आणले. त्याला सध्या एनआयए च्या विशेष न्यायालयाने १९ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

चौकशीत तो १९९८ ते २००० पर्यंत सौदी अरेबिया येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. तिथून त्याने बांग्लादेशमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतल्याचे कळते. यातूनच पाशाने डिसेंबर २००५ मध्ये बंगळूरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे आंतरराष्ट्रीय परिषदेतील हल्ला केला.

याशिवाय २०११मध्येही दहशतवादी हल्ला प्रकरणात तो सक्रीय होता. त्यात तो शिक्षा मिळालेला आरोपी आहे.

एनआयए करणार कसून चौकशी

दहशतवादी पाशाला नागपुरात आणल्यावर आता त्याच्या चौकशीसाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत.विशेष म्हणजे, त्याने कारागृहात अनेकांना प्रशिक्षण दिल्याची माहितीही समोर आल्याने त्याच्या चौकशीसाठी इंटेलिजन्स ब्युरो, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी नागपुरात दाखल झाले आहेत. सोमवारी या अधिकाऱ्यांनी पाशाची कसून चौकशी केल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT