file
file 
नागपूर

चोरी केल्यानंतर "तो' करायचा मौजमस्ती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर   : गावातील घरांमध्ये चोरी केल्यानंतर मौजमस्ती करायला मुंबई, गोवा, दिल्लीला जात असलेल्या एका अट्टल चोरास ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. या आरोपीचे नाव प्रवीण अशोक डेकाटे (मोहाडी. जि. भंडारा) असे आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट शहरापासून 10 किलोमीटर दूर असलेल्या राजेगाव येथे त्याला अटक केल्यानंतर नागपूरला आणण्यात आले.


60 लाख 60 हजाराचा माल लंपास
पोलिससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीचा विदर्भातील कित्येक चोरीच्या घटनांत समावेश आहे. चोरी केल्यानंतर आरोपी मौजमस्ती करण्यासाठी दुसऱ्या शहरात निघून जायचा. उमरेड शहरातील कावरापेठ वस्तीतील मंगेश जुनघरे यांच्या घरी आरोपीने 19 जानेवारीला चोरी करून घरातील 4 लाख 60 हजार रुपये रोख व 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 6 लाख 60 हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. मंगेश यांच्या तक्रारीनुसार, उमरेड पोलिासांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. लगेच कावरापेठ परिसरातील दुसऱ्या दुकानातही आरोपीने चोरी केली. दोन्ही घटनेतील साम्य लक्षात येताच पोलिसांनी त्या दिशेने तपासाची दिशा बदलली.

विदर्भातही अनेक ठिकाणी "हातसफाई'
चोरी केल्यानंतर आरोपी शहरातून दुसऱ्या मोठ्या शहरात मौजमस्ती करायला निघून जायचा. तो जेव्हा चोरी करायचा तेव्हा कधी दिल्ली, कधी गोवा, तर कधी मुंबई येथे जायचा. त्याने उमरेड शहरात दोन, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात 1, नागभीडमध्ये दोन आणि भंडाऱ्यात एक चोरी केली होती. याच आरोपीने विदर्भातील अनेक शहरांत हात साफ केले होते. आरोपी प्रवीण डेकाटे याला अटक केल्यानंतर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिस विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. ग्रामीणच्या प्रभारी अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, हवलदार संतोष पंधरे, शिपाई राधेश्‍याम कांबळे, बालाजी साखरे, सायबर सेलचे शिपाई सतीश राठोड, हवालदार भाऊराव खंडाते यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

SCROLL FOR NEXT