ag and bvg companies collect dry and wet garbage together in nagpur 
नागपूर

एजी, बीव्हीजी कंपनीचे पितळ उघडे; ओला अन् सुका कचरा एकत्रच

राजेश प्रायकर

नागपूर : शहरातील कचरा संकलनासाठी नियुक्ती एजी एन्व्हायरो व बीव्हीजी या दोन्ही कंपन्यांकडून घराघरांतून कचरा संकलन करताना ओला व सुका कचरा एकत्रच घेण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महापौर दयाशंकर तिवारी यांनी या दोन्ही कंपन्यांच्या कार्यप्रणालीचा अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. 

स्वच्छ सर्वेक्षण २०२१मध्ये नागपूर शहराचे रँकिंग वाढविण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी महापौरांनी शुक्रवारी (ता.५) विशेष बैठक बोलाविली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ नगरसेवक तथा आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विधी समिती सभापती अ‌ॅड.धर्मपाल मेश्राम, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, हरीश राऊत, अशोक पाटील, गणेश राठोड, विजय हुमने, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी व दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. घराघरातून ओला व सुका कचऱ्याचे योग्य विलगीकरण होत नसल्याचे आढळून आले. अनेक झोनमध्ये ३० ते ४० टक्केच कचरा वेगळा करण्यात येते. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित न करता मिश्रित कचरा डम्पिंग यार्डमध्ये पाठविल्यास दंडाची तरतूद करारनाम्यामध्ये आहे. त्यानुसार कोट्यवधींचा दंड दोन्ही कंपन्यांवर बसू शकतो. याशिवाय घरोघरून कचरा संकलित करताना एका गाडीवर चालकासह दोन सफाई कर्मचारी असणे करारामध्ये नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात एका गाडीवर एक कर्मचारी व एक चालकच असतो. एकूणच दोन्ही कंपन्यांच्या निष्काळजीपणाबद्दलही महापौर दयाशंकर तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली. 

मनपात कचरा गाडी - 
नागरिकांच्या कचरा संकलनाबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता तसेच ओला व सुका कचरा संकलित होत नसल्याचे निदर्शनास येताच महापौरांनी मनपामध्ये कचरा संकलन झालेली गाडी बोलाविली. ओला व सुका कचरा वेगळा संकलित होत असला तरी गाडीमध्ये तो विभाजित करण्यासाठी केवळ कापडी पडदा आढळून आले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT