Corona 
नागपूर

नागपूर शहरात आणखी 6 जणांना कोरोना; प्रशासनाची वाढली चिंता 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपुरात कोरोनाचा फास घट्ट आवळला जात असून बाधितांचा आकडा अर्धशतकाकडे झेपावत आहे. रविवारी एकाच दिवशी 14 जण कोरोनाबाधित आढळून आले. यानंतर लगेच रविवारी मध्यरात्री तिघांना तर सोमवारी दुपारी तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे मेयो-मेडिकलच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी सहाने वाढ झाली. सध्या मेडिकलमध्ये 24 तर मेयोत 14 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. बाधितांचा आकडा 47 वर पोहोचला असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. 

मरकजशी संबंधित असलेल्या 3 जणांमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण असल्याचे मेयोच्या प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालातून पुढे आले आहे. त्याच्या काही तासांनी मध्यरात्रीला मेडिकलच्या प्रयोगशाळेत सरतंजीपुरा परिसरातील आणखी तीन महिलांना कोरोना असल्याचे निदान झाले. या सगळ्यांना सक्तीने मेयोत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही तासांनी मेयोच्या प्रयोगशाळेत आणखी तीन जणांना कोरोना असल्याचे पुढे आले. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये आमदार निवास, लोणारा येथे सक्तीने विलगीकरणात असलेल्यांपैकी अनेकजण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल येत असल्यामुळे प्रशासन हादरले आहे. विलगीकरणातील संशयितांनाही धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, येथे मरकजशी संबंधित अनेकांनी विलगीकरणाच्या नियमाला हरताळ फासला आहे. एकत्र फिरणे, जेवण करणे असे नियमबाह्य कृत्य होत असल्याचे पुढे आले. त्यामुळे आता या रुग्णांच्या संपर्कामुळे इतर कुणाला कोरोना होतो की, काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

आईसह दोन मुलींना कोरोना

कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत असताना रुग्णाच्या संपर्कातील सतरंजीपुरातील अनेकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून मेडिकल, मेयोत दाखल केले आहे. त्याचप्रमाणे इतर ठिकाणीही सक्तीने विलगीकरणात ठेवले आहे. यापैकी एका 42 वर्षीय मातेसह तिच्या 14 आणि 15 वर्षांच्या दोन्ही मुलींना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. या मायलेकींवर मेयोत त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT