ajit pawar on development of vidarbha in legislative secretariat inauguration in nagpur 
नागपूर

'आता विदर्भातील जनतेला मिळणार थेट मदत, महाराष्ट्राचे संसदीय कामकाजात क्रांतिकारी पाऊल'

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : विदर्भामध्ये सर्वांगिण विकास झाला पाहिजे याबाबत दुमत नाही. विधानभवनाच्या या नवीन कक्षाचा उपयोग विदर्भातील आमदारांना फायदा होईल, त्याप्रमाणे विदर्भातील जनतेलाही फायदा होणार आहे. त्यांची अनेक कामे या कक्षातून मार्गी लागतील आणि आवश्यक ती मदत येथून उपलब्ध होऊ शकेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आज विधीमंडळ सचिवालयाच्या नव्या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  

विधीमंडळातील ज्या अधिकाऱ्यांना स्वच्छेने येथे यायचे आहे, त्यांचीच येथे नियुक्ती करावी. त्यांच्या इच्छेविरोधात नियुक्ती दिल्यास कामकाज होणार नाही. त्यामुळे त्यांच्या इच्छेचा विचार करायला हवा.  महाराष्ट्राच्या विधीमंडळाने हा कक्ष सुरू करून संसदीय कामकाजाच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. विधीमंडळाचे कामकाज प्रभावी होण्याबरोबरच विधीमंडळाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी मदत होईल. महाराष्ट्राचे विधीमंडळाची देशात एक वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा आहे. या विधीमंडळांनी क्रांतिकारी, लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. अनेक राष्ट्रीय नेते देशाला नेते दिले आहेत. जगातही संसदीय लोकशाहीचा आदर्श निर्माण केला. त्यामुळे आपण सर्वांनी प्रतिष्ठा राखण्याचे काम केले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी विदर्भातील आमदारांचे अभिनंदन देखील केले.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या प्रतिवर्षी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय बंद करण्यात येऊन विधान भवन, मुंबई येथे सुरू करण्यात येते. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता उर्वरित कालावधीत कार्यालय कामकाजासाठी बंद असते. विधानपरिषद सभापती व विधानसभा अध्यक्ष यांचा समावेश असलेल्या मंडळाने विधान भवन नागपूर येथील कार्यालय वर्षभरासाठी सुरू  करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार नागपूर येथे विधानमंडळ सचिवालयाच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी मान्यवरांसह प्रमुख उपस्थितीत तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT