social media crime sakal
नागपूर

सावधान : सोशल मीडियावर फोटोचा मोह टाळा; अन्यथा घरी होऊ शकते चोरी

सजग राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

राजेश रामपूरकर

नागपूर : दिवाळीनिमित्त अनेक जण आपापल्या शहरात किंवा गावी जातात. परंतु, सुटी एंजॉय करताना सोशल मीडियावर फोटो टाकण्याचा मोह त्यांना आवरता येत नाही. त्याच संधीचा गैरफायदा चोरटे घेऊन बंद घर बघून चोरटे घरफोडी करून मुद्देमाल लंपास करतात, त्यामुळे सजग राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

दिवाळी सणानिमित्त अनेक जण आपापल्या गावी निघून जातात. तसेच मुलांना सुट्या असल्यामुळे काही दिवस मुक्काम करतात. सुटीचा आनंद साजरा करताना सोशल मीडियावर सतत फोटो अपलोड करतात. त्यामुळे घरफोडी करणारे या संधीचा फायदा घेऊन बंद घरे शोधतात. रात्रीच्या सुमारास घरफोडी करून घरातील महागड्या वस्तू, सोने-चांदीचे दागिने चोरून नेतात. अशा अनेक घटना गेल्या काही दिवाळीच्या दरम्यान उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनीही यावेळी दिवाळीदरम्याम गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

यासोबतच नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गावी जाताना शेजाऱ्यांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे. तसेच नातेवाईक असल्यास त्यांना गावी जात असल्याची माहिती द्यावी. गावी जात असताना महागड्या वस्तू आणि सोन्याचे दागिने शक्यतो घरी ठेवू नये. यासोबतच नजीकच्या पोलिस ठाण्यातही सूचना द्यावी, जेणेकरून पोलिसांची गस्त व्यवस्थित ठेवतील.

फेसबुकवर फोटो अपलोड करू नये. त्यामुळे आपले लोकेशन समोर येत असल्यामुळे कुणी समाजकंटकही अशा गोष्टीचा फायदा घेऊ शकतात. सध्या शहरात क्युआर कोड सिस्टम लागू करण्यात आली असून गस्तप्रणाली व्यवस्थित सुरू आहे. पोलिस कर्मचारी रात्रीच्या सुमारास हमखास रस्त्यावर दिसतील. त्यामुळे चोरट्यांची घरफोडी करण्याची हिम्मत होणार नाही. परंतु, नागरिकांनी स्वतः सजग राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT