All districts of Vidarbha are in Danger Zone Below average rainfall 
नागपूर

विदर्भातील सर्वच जिल्हे ‘डेंजर झोन’मध्ये!

सरासरीच्या कमी पाऊस

नरेंद्र चोरे

नागपूर - भारतीय हवामान विभागाने यंदा शंभर टक्क्यांच्या वर पावसाचा अंदाज वर्तवून शेतकऱ्यांच्या आशा जागविल्या. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती एकदम याउलट आहे. जून महिन्यात विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या खूप कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, लवकर दमदार पाऊस न आल्यास त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ येणार आहे.

सर्वाधिक पावसाच्या तीन महिन्यांपैकी जून संपून जुलै महिना सुरू झाला आहे. जूनमध्ये नागपूर जिल्ह्यातच नव्हे, संपूर्ण विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. १ ते ३० जूनदरम्यान विदर्भात सरासरीच्या (१७५ मिलिमीटर) केवळ ६१ टक्के (१०६ मिलिमीटर) बरसला, जो ३९ टक्के कमी आहे. हवामान विभागानुसार, विदर्भात आतापर्यंत सर्वात कमी पाऊस यवतमाळ जिल्ह्यात ८५ मिलिमीटर पडला असून, अमरावती व वर्धा जिल्ह्यांत प्रत्येकी ९१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १३६ मिलिमीटर पाऊस पडला. पावसाची आतापर्यंतची आकडेवारी लक्षात घेता, विदर्भातील सर्वच जिल्हे सध्या ‘डेंजर झोन’मध्ये आहेत. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे. बळीराजाच्या सर्व आशा आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांवर आहे. या महिन्यांत समाधानकारक पाऊस पडला तरच बंपर पीक होणार आहे.

१६ जूनला मॉन्सून दाखल झाल्यापासून नागपुरात केवळ एकच दिवस (२३ जूनला) ६० मिलिमीटर पाऊस बरसला. त्यानंतर वरुणराजाने केवळ नावापुरतीच अधूनमधून हजेरी लावली. उशिरा आलेल्या व पुरेशा पावसाअभावी सध्या पेरण्या खोळंबल्या असून, अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय हवामान विभागाने यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तो अंदाज आतापर्यंत तरी साफ खोटा ठरलेला आहे.

हवामान विभागावर कसा ठेवणार विश्वास ?

प्रादेशिक हवामान विभागातर्फे जवळपास दररोजच विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात येतो. मात्र पावसाचा एक थेंब पडत नाही. आकाशात ढग जमतात आणि क्षणार्धात शिडकावा करून गायब होतात. ‘कुठे गरजतो, तर कुठे बरसतो’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हवामान विभागाच्याही अंदाजावर शंका व नाराजी व्यक्त केली जात आहे.

विदर्भात १ ते ३० जूनदरम्यान पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

जिल्हा प्रत्यक्ष पाऊस सरासरी पाऊस तूट

नागपूर १२० १७४ -३१

अकोला १०५ १४४ -२७

अमरावती ९१ १५० -३९

वर्धा ९१ १७० -४७

यवतमाळ ८५ १७३ -५१

भंडारा ११० १८७ -४१

गोंदिया १३६ १९६ -३०

चंद्रपूर १२१ १८८ -३६

गडचिरोली ११७ २२० -४७

वाशीम १०७ १७८ -३९

बुलडाणा १०३ १३४ -२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT