corona 
नागपूर

... आणि शेवटी आज सुटले त्यांचे ग्रहण, संपूर्ण कुटुंबानेच केली कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दुपारी 4 वाजताची वेळ. कोरोना वॉर्डातून तिघेजण बरे होऊन घरी जाणार म्हणून साऱ्या डॉक्‍टर परिचारिकांनी त्यांचे फुलं देऊन अभिनंदन केले. त्या तिघांनीही मेयोतील डॉक्‍टरांचे आभार मानले. आमच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनामुक्त केल्याबद्दल आभार हे शब्द खामला येथील कोरोनाबाधित त्या महिलेचे. तिघांचेही डोळे पाणावले. डॉक्‍टरांनी घरी काळजी घ्या, असा सल्ला दिला. एक दिवस आधीच खामला येथील कोरोबाधित बरा होऊन घरी परतला. दुसऱ्याच दिवशी याच तरुणाची आई, पत्नी आणि मुलगी बरी होऊन घरी परतले. या कुटुंबाने कोरोनावर मात केली.
मेयोत खामला येथील संपुर्ण कुटुंब कोरोना वॉर्डात भरती होते. त्या रुग्णाच्या साठ वर्षीय आईने कोरोनावर विजय मिळवला. यामुळे मेयोतील डॉक्‍टर, परिचारिका यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. वॉर्डातून बाहेर निघताना या तिघांनीही डॉक्‍टरांचे आभार मानले. खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्‍टरांनी या तिघांना 14 दिवस घरी आराम करण्याचा सल्ला दिला. खामल्यातील तीन रुग्ण पूर्ण बरे झाले. उपराजधानीतील 8 कोरोनाबाधित बरे झाले.
शहरात वाढत्या कोरोनाबाधितांमुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये संचारबंदी अधिक कडक करण्यात आली. त्यात शनिवार नागपुरात दिलासा देऊन गेला. खामला येथील तिघे जण घरी परतले. 26 मार्च रोजी मेयोत खामला येथील कोरानाबाधिताच्या संपर्कात आल्याने संपूर्ण कुटुंबालाच दाखल करण्यात आले होते. तब्बल 15 दिवसानंतर त्या रुग्णाची 60 वर्षांची आई, 35 वर्षांची पत्नी तसेच 16 वर्षांची मुलगी बरी झाली. त्यांना मेयोतून सुटी देण्यात आली. या कुटुंबाच्या तीनही चाचण्या कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना शनिवारी घरी पाठविण्यात आले. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्यासह उपचार करणारे डॉक्‍टर, परिचारिका उपस्थित होते. या सर्वांनी या कुटुंबाचे मनोबल वाढविण्यासाठी टाळ्या वाजवल्या. पुढील 14 दिवस घरी राहावे, घरातून बाहेर पडू नये असा सल्ला डॉ. सागर पांडे यांनी दिला.
भारावलेल्या वातावरणात निरोप
कोरोनाची प्रचंड दहशत पसरली. मात्र उपराजधानीत कोरोनाच्या बाधेमुळे दाखल झालेले रुग्ण बरे होऊन घरी जात आहे. ही समाधानकारक बाब आहे. पंधरा दिवसात 8 जण मेडिकल आणि मेयोतून बरे होऊन गेले. कोरोना वॉर्डातून बाहेर निघताना त्या तिघिंनीही त्या वॉर्डातील सर्वांशी भेट घेतली. त्यांना लढण्याचे बळ दिले. नव्हेतर डॉक्‍टर, परिचारिका आणि परिचर यांचे आभार मानले. भारावलेल्या वातावरणात कोरोनाशी लढा देणाऱ्या या तिघींना साऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा प्रशासन, महानगरपालिकाआणि पोलिसांनी केलेल्या सहकार्याबाबत आभार मानले. 60 वर्षीय महिलेच्या डोळ्यातून पाणी आले.

सविस्तर वाचा - यवतमाळ शहरातील या भागात करण्यात आली सीमाबंदी; प्रवेश करण्यास सक्त मनाई
सर्वांची प्रकृती ठणठणीत
खामला परिसरातील संपूर्ण कुटुंब कोरोनामुक्त झाले. सर्वांची प्रकृती बरी आहे. शुक्रवारी दिल्लीतून आलेल्या त्या कोरोबाधिताला सुटी दिली. शनिवारी त्याचे कुटुंब कोरोना मुक्त झाले. सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिकांच्या सेवेमुळे ते बरे झाले. विशेष असे की, रुग्णांनी मेयोवर ठेवलेला विश्‍वास आणि दाखवलेला संयमही तेवढाच मोलाचा आहे. शासन आणि प्रशासनाच्या निर्देशानुसार यांना सुट्टी दिली.
डॉ. सागर पांडे, वैद्यकीय उपअधीक्षक, मेयो.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raid On Ambani Companies : अंबानींच्या कंपन्यांवर १० ते १२ ठिकाणी छापेमारी, १५ पथके तपासात

Latest Marathi News Live Update : चार धाम यात्रेसाठी नोंदणी आजपासून सुरू

IAF Sukhoi Crash : आसाममध्ये सुखोई विमान कोसळले; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपुत्र पूर्वेश दुरगकर शहीद

Iran–Israel Conflict: बॉम्ब-मिसाईलच्या सावटाखाली दुबईत अडकले; घरी पोहोचताच ‘जीव भांड्यात पडला’ सातारा, सांगली, रत्नागिरीतील २६ जणांची सुटका

भारत फायनलमध्ये गेला पण वरुण धवन का चिडला? सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT