anil deshmukh on crime rate in nagpur 
नागपूर

बलात्कारासह खुनाच्या घटनांमध्ये घट होऊनही नागपूर गुन्हेगारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर का? गृहमंत्री देशमुखांनी सांगितले कारण

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : एनसीआरबीने जाहीर केलेला रिपोर्ट हा २०१९ चा आहे. तसेच त्यामध्ये लोकसंख्या चुकीची दाखविली आहे. नागपूर, कामठी आणि हिंगणा असे मिळून जवळपास ३० लाख लोकसंख्या आहे. मात्र, २५ लाखांवरच हा अहवाल दाखविण्यात आला आहे. लोकसंख्येनुसार दुरुस्ती केल्यास गुन्हेगारीमध्ये नागपूरचा क्रमांक नक्कीच खाली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. आज नागपुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

कामठी, नवीन कामठी, हिंगणा हे पोलिस ठाणे नागपूर ग्रामीणमधून काढून नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. एनसीआरबीने अहवाल तयार करताना तिन्ही पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समावेश केला आहे. मात्र, त्या भागातील लोकसंख्येचा समावेश केला नाही. त्यामुळे त्यांच्या विश्लेषणामध्ये तफावत दिसून येत आहे. यापूर्वीसुद्धा त्यांच्या विश्लेषणामध्ये तफावत आढळून आलेली आहे आणि त्याबाबत त्यांना कळविले आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. 

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. हेलमेट न वापरणे, फॅन्सी नंबर प्लेट वापरणे, अवैध वाहतूक यावर पोलिस करडी नजर ठेवून आहेत. तसेच अपघातांचे प्रमाण देखील कमी झाले आहे. २०१९ मध्ये ७२० अपघात झाले होते, तर २०२० हीच संख्या घटून ५१५ वर आलेली आहे. खुनाच्या घटनांमध्ये दोनने घट झाली असून यंदा फक्त ८८ खुनाच्या घटना घडल्या आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे दरोड्यामध्ये वाढ झाली असून हे प्रमाण १९ वर पोहोचले आहे. घरफोडीच्या घटनांमध्ये देखील घट झाली असून २०१९मध्ये ८०१ घरफोडीच्या घटना घडल्या होत्या, तर २०२० मध्ये ६५८ घडल्या आहेत. तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये ९ टक्क्यांनी घट झाली असून  बलात्काराच्या घटनांमध्ये ४ टक्क्यांनी घट झाली आहे, असेही गृहमंत्री म्हणाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : आता मंत्रालयात नाही तर शेतकऱ्याच्या बांधावर होणार शेतीची चर्चा; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितला उत्पन्नाचा मंत्र!

Sunday Special Recipe: सुट्टीच्या दिवशी ट्राय करा घरगुती खास पुलाव, बनवायला अगदी सोपा

Pushkar Singh Dhami : वन्यजीव हल्ल्यांवर मुख्यमंत्र्यांचा अ‍ॅक्शन मोड; ३० मिनिटांपेक्षा उशीर झाला तर वनअधिकाऱ्यांवर कारवाई!

आजचे राशिभविष्य - 14 डिसेंबर 2025

Asia Cup Trophy Controversy : ‘ऑपरेशन’ आशिया करंडक

SCROLL FOR NEXT