Anil Deshmukh will do Kanyadan ceremony in Varsha wedding in Nagpur  
नागपूर

२४ वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकावर सापडलेल्या 'वर्षा'चं गृहमंत्री अनिल देशमुख करणार कन्यादान 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर ः २४ वर्षांपूर्वी एक चिमुकली आढळली होती रेल्वेस्थानकावर.. प्रसिद्ध समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात तिचे पालन-पोषण आणि शिक्षण झाले. आता तिचा विवाह तिच्याच सारख्या मुंबईच्या डोंबीवली रेल्वेस्थानकावर सापडलेल्या मुलासोबत होणार आहे आणि या मुलीचे कन्यादान करणार आहेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख. 

येत्या २० तारखेला सायंकाळी ५ वाजता नागपूरमध्ये हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचेही गृहमंत्री म्हणाले. लहानपणी सापडलेली मुलगी वर्षा शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात लहानाची मोठी झाली. शंकरबाबा वर्षासारख्या शेकडो मुलामुलींचे पालक आहेत. 

अनाथ मुलामुलींचे पालन-पोषण आणि शिक्षण झाल्यानंतर मायबापाच्या मायेने ते त्यांची लग्न लावून देतात. त्यांच्या या समाजकार्याला राज्याचे मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी अशा सर्वच स्तरातून मोठा सहभाग लाभतो. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर येथे शंकरबाबांचा आश्रम आहे आणि अमरावती जिल्ह्यातच विवाह सोहळा होत असतो.

काय म्हणाले गृहमंत्री 

‘मी कायम शंकरबाबांच्या आश्रमात भेट द्यायचो. तेव्हा मी वर्षाला दत्तक घेतले. आम्ही येत्या २० तारखेला नागपूर येथे वर्षाप्रमाणेच मुंबईच्या स्टेशनवर मिळालेल्या मूकबधिर चि. समीर याच्यासोबतच तिचा विवाह करण्याचे आयोजिले आहे. मी स्वतः वर्षाचे कन्यादान करणार आहे. यानिमित्ताने काल मी शंकरबाबा पापळकर यांच्यासह आमचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन विवाहाचे निमंत्रण दिले आहे.’

कोण आहेत शंकरबाबा

श्री. शंकरबाबा पापळकर हे थोर समाजसवेक असून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भक्त आहेत. तसेच ते थोर कर्मयोगी गाडगेबाबा यांचे नातजावई आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते वझ्झर फाटा, पो. मल्हारा, ता. अचलपूर, जि. अमरावती येथे स्व. अंबादास वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृहाच्या माध्यमातून अनाथ मुला-मुलीचे संगोपन करीत आहेत. संगोपनासोबत त्यांचे पुनर्वसन करून त्यांचे विवाह करून देतात. आतापर्यत त्यांनी अशाच अनाथ अपंग असलेल्या २३ जोडप्यांचे विवाह लावून दिले आहेत. समाजातील अपंग व निराधार मुलांसाठीचे त्यांचे फार मोठे काम आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

IPL 2026: विराट-धोनी आमने सामने येणार नाहीतच! MS Dhoni च्या खेळण्याबाबत नवी अपडेट समोर

Nagpur Bhosale Descendants : शिवरायांशी नागपूरच्या भोसले घराण्याचे नाते काय? नव्या पिढीचे वंशज आता काय करतात? पाहा वीरांचा वारस

Aniket Verma Inspirational Jounery : ३ वर्षांचा असताना आईचे निधन; वडिलांचे दुसरे लग्न... हार्दिक पांड्याची 'मॅगी' स्टोरी अन्...

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

SCROLL FOR NEXT