Animals like cow and other not getting food properly in Nagpur  
नागपूर

दुर्दैवी! चाऱ्याअभावी जनावरांची भटकंती; शिवार पडले ओसाड, पशुपालक संकटात

सकाळ वृत्तसेवा

गुमगाव (जि. नागपूर) :  यंदा बोंडअळी आणि अवकाळी पावसामुळे गुमगाव परिसरातील कोरडवाहू कपाशी व तुरीचे पीक आधीच हातचे गेल्यानंतर गहू आणि तुरीने अपेक्षेप्रमाणे साथ दिली नाही. हे संकट कायम असतानाच परिसरात चाऱ्याअभावी जनावरांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे. त्यामुळे पशुपालन कसे करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

हिंगणा तालुक्यातील गुमगाव, लाडगाव, वागधरा, धानोली, वडगाव-गुजर, कोतेवाडा, सुमठाणा, कान्होली, गोधनी, जामठा, दाताळा, शिवमडका या शिवारातील हजारो एकर शेती विविध प्रकल्पाच्या नावाने शेतकऱ्यांच्या हातातून गेली. शेतीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड, सगळीकडे जमिनीचे झालेले सपाटीकरण, सिमेंटीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाने वेग घेतला. 

हिरवाई जाऊन सगळीकडे सिमेंटची जंगले उभे होत आहेत. साहजिकच शेतीअभावी पर्यायाने मातीअभावी चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा उपलब्ध नसल्यामुळे जनावरांना मोजक्याच चाऱ्यावर समाधान मानावे लागत आहे.

नशिबी पालापाचोळाच 

मागील काही वर्षांपासून जनावरांना मूठभर चारा टाकून शेतकऱ्याला जनावरांची भूक भागवावी लागत आहे. गेल्या काही वर्षात दुष्काळाने आणि नापिकीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना या पिकांचा उत्पादन खर्चसुद्धा निघाला नसताना आता पशुपालन करायचे कसे, अशी चिंता भेडसावत आहे. जनावरांना मात्र मिळेल तो पालापाचोळा खाऊन कसेबसे पोट भरावे लागत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT