file
file 
नागपूर

कर्ज काढून मुलाचा उपचार करताना असहय झाल्याने विलासने केला शेवटचा निश्‍चय, मग काय झाले,..

मनोहर घोळसे

सावनेर (जि.नागपूर) : दीड एकर शेती, उद्योगधंदा नाही, डोक्‍यावर वाढलेले कर्ज, मुलाचा दुर्धर आजार, त्यातच कोरोनाचे संकट या चक्रव्युहात सापडलेल्या विलास नामदेव टेकाडे या शेतक-याने आत्महत्तेचा मार्ग निवडला. प्रश्‍नांच्या विवरातून स्वतःची त्यांनी गेल्या आठवडयात सुटका करून घेतली. पण त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा अधिकच ताण वाढला.

हेही वाचा  : काय मस्त चाललंय ! लाखोंची वाळूचोरी तरीही, महसूल विभागाचे तोंडावर बोट, हाताची घडी...

सरळ मनाच्या विलासपुढे पर्याय नव्हता
कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच सावनेर तालुक्‍यातील बोरगाव शिवारात घडल्याने आता संसाराचा गाडा पुढे ढकलायचा कसा, असा प्रश्न दीड एकर शेतीशिवाय उपजीविकेचे साधन नसलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी विलास नामदेव टेकाडे यांच्या पत्नी वंदना टेकाडे यांना पडला आहे. जीवनाच्या वाटेवर सुखदुःखात साथ देणाऱ्या वंदनाचा संसार 2005 पासून सुरू असताना सर्वांशी गोडीगुलाबीने वागणाऱ्या विलासने अखेरचा निरोप घेतला. त्यामुळे पत्नी वंदना व मुलगा प्रथमेश उघड्यावर आल्याने वंदनापुढे उपजीविकेचा प्रश्न मुलाच्या आरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा  : अधिकाऱ्यांने टाकला व्हॅट्‌सऍप गृपवर मॅसेज...जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

घटनेने गावात हळहळ
विलास टेकाडे हे बोरगाव येथील वडिलोपार्जित घरी राहत होते. एकत्रित कुटुंब असल्याने संपत्तीची वाटणी झाली नसली तरी त्यांच्या वाट्याला येणारी दीड ते दोन एकर शेती ते करायचे. मात्र, सततच्या नापिकीमुळे शेती न परवडणारी झाल्याने एका छोट्याच्या खासगी कंपनीत कामाला जात होते. मुलगा
प्रथमेश याला आजार असल्याने कर्ज काढून मुलाच्या आजाराला पैसे लागत असताना कसाबसा संसाराचा गाडा सुरू होता. लॉकडाउनमध्ये हातून काम गेले. शेतीला लावायला पैसे नाही, अशा आर्थिक विवंचनेत असताना विलासने आत्महत्या केल्याचे समजते. घडलेल्या घटनेबाबत गावातही सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पशुसंवर्धन मंत्री केदार यांच्याकडून अपेक्षा
येथील सरपंच वैशाली तेजराम टेकाडे व भाजप नेते ऍड. प्रकाश टेकाडे यांच्यावतीने वंदना व तिच्या मुलाला भावनिक आधार दिला जात आहे, तर राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी नुकतीच भेट देऊन शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी मृताच्या पत्नीला धीर दिला आहे. यामुळे जरी दुःखाचा डोंगर उभा असलेल्या वंदनाला जगण्याचे बळ मिळत असले तरी मात्र शासनाकडून उपजीविकेसाठी आर्थिक साहाय्य व घर बांधण्यासाठी आर्थिक सहकार्य मिळण्यासाठी राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडून अपेक्षा बाळगून आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT