Any other use of "lift" ... read more 
नागपूर

"लिफ्ट' चा असाही उपयोग...वाचा कमाल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात प्रत्येक विभागात सावळा गोंधळ आहे. नुकतेच एका विभागात विद्यार्थी रुग्णांकडून पैसे घेत अर्थकारण करीत असल्याचे प्रकरण उजेडात आले. येथील एक्‍स रे काढताना "सीडी' ची मागणी केली जात असल्याचे प्रकरणही उघडकीस आले. आता पुन्हा एक धक्कादायक बाब पुढे आली असून मागील पाच वर्षांपुर्वी दंत महाविद्यालयात लावण्यात आलेली "लिफ्ट' एकदाही वापरण्यात आली नाही. विशेष असे की, सामान ठेवण्यासाठी "लिफ्ट' चा गोदाम म्हणून वापर होत आहे.

दंत महाविद्यालय व रुग्णालयात विद्यार्थी, रुग्ण तसेच इतरांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा पैसा वापरला जातो. निवृत्त अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांच्या कारकिर्दीत दहा ते पंधरा लाख खर्च करून "लिफ्ट' बसवण्यात आली. मात्र ही लिफ्ट कधीच सुरू झाली नाही. विशेष असे की, डॉ. हजारे अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले. यानंतर डॉ. सिंधू गणवीर यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा कार्यभार आला. डॉ. गणवीर यादेखील निवृत्त झाल्या. आता डॉ. मंगेश फडनाईक प्रभारी अधिष्ठाता पदाचा कार्यभार सांभाळत आहे. मात्र ही लिफ्ट सुरू झालेली नसून अक्षरश: धूळ खात पडली आहे. डॉ. विनय हजारे दंतचे अधिष्ठाता असताना त्यांनी या लिफ्टचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर डॉ. सिंधू गणवीर यांच्या कार्यकाळात ही लिफ्ट बसविण्याचे काम सूरू झाले. लिफ्ट बसवून झाली. तिचे ट्रायल झाले. लिफ्ट बसविलेल्या कंत्राटदाराने लिफ्ट सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले व कामाचे बिल सादर केले. त्याचे बिल अदा झाले. मात्र ती लिफ्ट अडगळीत पडून आहे. नको असलेली लोखंडी कपाटे या लिफ्टच्या दाराजवळ पडलेली आहेत.

जबाबदार कोण?

लिफ्ट बसवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाले की, इतर कंत्राटदारांकडून झाले, याबाबत माहिती मिळाली नाही. किमान विद्यमान अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांना लिफ्ट सुरू करून सेवेत दाखल करण्याची सुचकता अद्यापही दाखविता आली नाही. यामुळे ही लिफ्ट सूरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून कोणता "कागदी घोडा' नाचविणार असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाला जबाबदार कोण याचा शोध घेऊन त्या अधिकाऱ्यांकडून पैसा वसुल करण्यात यावा, अशी मागणी इंटकचे त्रिशरण सहारे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT