gudiya
gudiya  
नागपूर

कोरोनाचे कारण पुढे करीत हत्याकांडप्रकरणातील आरोपीचा जामिनासाठी अर्ज, न्यायालयाने मात्र नाकारला

सकाळ वृत्तसेवा

नागपुर : कोरोनाचा कोण कसा उपयोग करून घेईल सांगता येत नाही. सगळ्यांच्या काळजीचा विषय ठरलेल्या कोरोनाने गुन्हेगारांचे मात्र चांगलेच फावत आहे. कुख्यात अंडरवर्ल्डडॉन अरुण गवळीला कोरोनामुळेच मुंबईतील कारागृहाने प्रवेश नाकारला होता, आणि आता हत्याकांडप्रकरणातील एका आरोपीने कोरोनाचे कारण पुढे करीत जामीन मागितला आहे. अर्थात न्यायालयाने तो फेटाळला आहे.
शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपी गुड़िया शाहुने जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आजारी सासूला कोरोना होण्याची भीती असल्याने जामिन देण्याची विनंती तिने न्यायालयाला केली. अर्ज दाखल करण्याची तिची ही सहावी वेळ होती.
अर्जानुसार, गेल्या दोन वर्षांपासून आपण न्यायालयीन कोठडीत असून त्या दरम्यान मुलगा आदित्य याचा जन्म झाला. पती देखील न्यायालयीन कोठडीत असल्याने घरी असलेल्या आजारी सासूची काळजी घेण्याकरिता कोणीही नाही. घरी एकट्या असणाऱ्या सासूला कोरोना होईल अशी काळजी वाटत असल्याने आपला मुलगा आदित्य व सासूची काळजी घेण्याकरिता जामिनावर मुक्त करण्यात यावे, अशी विनंती तिने अर्जाद्वारे केली. कोरोना साथीशिवाय खटल्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. तसेच,अर्जदारासह अन्य आरोपींविरुद्ध भादवि कलम 302 व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपीविरोधातील दाखल गंभीर गुन्हे लक्षात घेता जामिन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. या सर्व बाबी बघता न्यायालयाने गुडीया शाहूचा जामिन अर्ज फेटाळला. तसेच, सासूला कोरोना होईल या भीतीने आरोपीला जामिन मंजूर होऊ शकत नाही, असा निर्वाळा देखील दिला. शासनातर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांच्या सहकारी ऍड. दिपिका गवळी यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणी न्यायाधीश सुनील पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली.  

सविस्तर वाचा - ...आणि आयुक्त तुकाराम मुंढे पोचले जनतेत; केले हे आवाहन
आजी आणि नातीची झाली होती हत्या
उषा सेवकदास कांबळे (वय 54) आणि दीड वर्षीय राशी रविकांत कांबळे या दोघींची 17 फेब्रुवारी 2018 रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. आजी-नातीच्या या दुहेरी हत्याकांडात अंकित शाहू (वय 22, रा. पवनसूतनगर, दिघोरी) हिच्यासह पोलिसांनी दुसऱ्या दिवशी मुख्य आरोपी गणेश शाहू आणि त्याची पत्नी गुडिया यांना अटक केली. तर, त्याच्या एका 17 वर्षीय नातेवाईकाला ताब्यात घेतले होते. दोघींचेही मृतदेह पोत्यात कोंबून आरोपींनी विहीरगावजवळच्या नाल्यात फेकले होते. या हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यांच्या घरातून रक्ताने माखलेले कपडे, काही चीजवस्तू आणि खिडकीचे पडदे जप्त करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT