arms smuggler Golden King arrested 
नागपूर

कुख्यात शस्त्र तस्कर गोल्डन राजाला अटक; हत्याकांड घडविण्यासाठी पुरवली होती पिस्तूल

अनिल कांबळे

नागपूर : भाजीविक्रेता उमेश ढोबळे (वय ३५, रा. सोमलवाडा) याची हत्या करण्यासाठी शेख शाकीर शेख हुसेन (वय ३०, रा. भालदारपुरा) याला पिस्तूल पुरविणाऱ्या कुख्यात तस्कराला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. शेख नदीम ऊर्फ राजा गोल्डन शेख नाजीम (वय २३, रा. सिंधीबन) असे अटकेतील तस्कराचे नाव आहे. नदीम याचा चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डन राजा हा कुख्यात शस्त्र तस्कर आहे. त्याच्याविरुद्ध शस्त्र प्रतिबंधक कायद्यासह सहा गुन्हे दाखल आहेत. चार महिन्यांपूर्वी शाकीर याने गोल्डन राजा याच्याकडूनच ३५ हजार रुपयांमध्ये पिस्तूल खरेदी केले होते. सहा लाख रुपयांच्या वादातून शाकीर याने साथीदार सय्यद इमरान सय्यद जमल (वय २४, रा. टिमकी) याच्या मदतीने पिस्तुलातून गोळी झाडून उमेश याची हत्या केली. याप्रकरणात सक्करदरा पोलिसांनी शाकीर व इमरान या दोघांना अटक केली.

पोलिसांनी शाकीर याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान गोल्डन राजा याच्याकडून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती शाकीर याने पोलिसांना दिली. आशीर्वादनगर परिसरात राजा हा पोलिसांना संशयास्पदस्थितीत दिसला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. पोलिसांनी त्याला अटक केली. कसून चौकशी केली असता पोलिसांनी त्याच्याकडून आणखी दोन पिस्तूल जप्त केले.

उत्तरप्रदेशातून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. राजा याची मंगळवारपर्यंत तर उमेश हत्याकांड प्रकरणात अटकेतील शाकीर व त्याच्या साथीदारांची २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी संतोष इंगळे गोविंद, रोहन, नीलेश, पवन, आरती यांनी केली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Fire: दिल्ली हादरली! ९ जण जिवंत जळाले; तीन निष्पाप मुलींचाही समावेश, उडी मारून दोघांनी वाचवला जीव, नाहीतर...

नोराचं ‘सरके चुनर तेरी सरके’ गाणं काय घेऊन बसलात, माधुरीच्या 'या' गाण्याला तर केलेलं बॅन, प्रत्येक शब्द डबल मिनिंग

एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा! ‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Pune Gas Supply: पुण्यातील हॉटेल व्यवसायाला पावाचा पर्याय; व्यावसायिक गॅसपुरवठा विस्कळित झाल्याचा परिणाम, लहान विक्रेते संकटात!

AC कूलिंग वाढवायचंय? मेकॅनिककडून ‘या’ 4 गोष्टी जरूर चेक करून घ्या

SCROLL FOR NEXT