asthi of corona bodies are still in Cemetery 
नागपूर

दुर्दैवी! त्यांच्या नशिबी मरणानंतरही लॉकडाउन.. कित्येक दिवसांपासून कोरोनामृतांच्या अस्थी स्मशानातच 

केवल जीवनतारे

नागपूर:  वर्षानुवर्षांचे नात्याचे ऋणानुबंध, परंतु अवघ्या सहा महिन्यात कोरोनाने जगण्या-मरण्याची पद्धत बदवलली. नात्यांमध्ये दरी निर्माण झाली. कोरोनाच्या मृत्यूनंतर हक्काच्या माणसांना अत्यसंस्कार करता येत नाही. अंत्यसंस्कारात सहभागी होता येत नाही. ना मृत्यूचे दुःख, ना घरासमोर वाहणारा अश्रूंचा महापूर दिसत...ना हंबरडा फोडता येत, ना प्रेताला खांदा देता येत. चिता रचल्यानंतर सरणाला अग्नीसुद्धा देता येत नाही, विद्युत दाहिनीवरच अंत्यंसंस्कार. आता कुठे चितेला अग्नि देण्याची परवानगी दिली, नात्याला डावलून तेही काम प्रशासन करते. मृत्यूनंतर अस्थींचे परंपरेनुसार विसर्जन व्हावे ही नातेवाईकांची इच्छा असते, परंतु वाहतूक बंद असल्याने अनेकांच्या अस्थी घाटावरील लॉकरमध्ये लॉकडाऊन आहेत.

कोरोनाने मृत झालेल्या परिवारातील जवळचे नातेवाईक कुठे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर तर मेयो, मेडिकल व इतर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अंत्यसंस्काराची जबाबदारी मनपाकडून पार पाडली जाते. शहरात १० स्मशानभूमी (घाट) आहेत. प्रामुख्याने त्यापैकी गंगाबाई घाट, मोक्षधाम, अंबाझरी घाट, वैशालीनगर व इतर घाटांरही कोरोना मृतांवर विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार केले जातात. ज्यांनी अस्थि नेल्या नाही, अशा मृतकाच्या अस्थी (हाडे) लॉकरमध्ये ठेवण्यात येतात. 

एका लॉकरमध्ये ३ ते ४ मृतकांच्या अस्थी

नियमानुसार, एका कोरोनामृत व्यक्तीच्या अस्थी एका लॉकरमध्ये ठेवण्यात याव्यात. नातेवाईक अस्थि घेण्यास असमर्थ असल्याने त्या लॉकरमध्ये ठेवण्यात येतात. तर कोणाला परंपरेनुसार अस्थींचे विसर्जन करायचे असते, अस्थी घरी नेण्याएवजी घाटावरच ठेवतात. यामुळेही अस्थी घेण्यासाठी नातेवाईक घाटावर पोहचत नाही. घाटांवर कोरोनामृतकांच्या अस्थींची संख्या वाढत असल्याने एका लॉकरमध्ये ३ ते ४ मृतकांच्या अस्थी ठेवण्यात येत आहेत. मृत्यूचा वाढता आकडा बघता अंत्यसंस्कारानंतर ठेवण्यात येणाऱ्या अस्थिसांठी नागपूरच्या घाटावर लॉकरची संख्या कमी असल्याचे दक्षिण नागपुरातील एका घाटावर कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

घाटावरचे कर्मचारी करतात अस्थींची रक्षा

कोरोना संसर्गामुळे वाहतूक बंद आहे. यामुळे अनेक कुटुंबातील मृतकांच्या अस्थी शहरातील मोक्षधाम, गंगाबाई घाट, अंबाझरी घाट, गंगाबाई घाट या घाटांवर लॉकरमध्ये नातेवाईकांच्या मर्जीनुसार ठेवण्यात आल्या आहेत. अप्रत्यक्षरित्या घाटावरील कर्मचाऱ्यांवर अस्थींच्या सुरक्षेची जबाबदारी आली आहे. शहरातील घाटांवरील एकूण लॉकरची संख्या शंभरावर आहे.

काही ठिकाणी लॉकरच नाहीत 

दिवसेदिवस मृतांची संख्या वाढत असल्याने हे लॉकर अपूरे पडण्याची दाट शक्यता आहे. मोक्षधाममध्ये २४ तर अंबाझरीमध्ये ४८ लॉकर वगळता उर्वरित गंगाबाई घाट. मानेवाडा घाट, शांतीनगर घाट, मानकापूर घाट येथे प्रत्येकी १२ लॉकर आहेत. सहकारनगर, वाठोडा, दिघोरी घाटावर लॉकर सुविधा नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT