file photo 
नागपूर

दमाग्रस्तांना कोरोना संसर्गाची जोखीम... अशी घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे, अशांना कोरोनाचा जास्त धोका आहे. कोरोनाचा विषाणू थेट फुप्फुसांवर परिणाम करतो. तसेच दमाही फुप्फुसाशी निगडित आहे. यामुळे दमा अर्थात अस्थमा असलेल्यांना कोरोना संसर्गाची जोखीम अधिक आहे. 

जागतिक अस्थमा दिन पहिल्यांदा 1998 साली बार्सिलोना, स्पेनमधील पहिल्या वर्ल्ड अस्थमा बैठकीत 35 पेक्षा जास्त देशांमध्ये जीआयएनएने साजरा करायला सुरुवात केली. यावर्षी काळजी गट आणि अस्थमा शिक्षक यांना 'दमा नियंत्रित करण्यासाठी वेळ' ही थीम वापरून अस्थमा दिनाबाबत जागरुकता कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. आज (ता. 5) जागतिक अस्थमा दिवस आहे, या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध दमारोग तज्ज्ञ डॉ. आकाश बल्की यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला, आकाशात ढग असताना, दमट हवामान व वातावरण अशुद्ध असल्याने दमा आजाराचा वेग वाढतो. त्यावेळी श्‍वासनलिका आकुंचन पावतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर पूर्वी योग्य चिकित्सा झाली नसल्यास व्याधींचा संसर्ग वाढतो. मधुमेहावर नियंत्रण नसेल, तर फुप्फुसांवर त्याचा प्रभाव होऊन कार्यक्षमता कमी होते. श्‍वास घेण्याची गती वाढताना दिसते. दमा आजाराचा पूर्वेतिहास असलेल्या व्यक्तीला निश्‍चितपणे अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

अशी घ्यावी काळजी 
दमा आजार असलेल्यांनी औषधं वेळेवर घेत राहणे, कफ विरोधी आहार सेवन करावा, कफ वाढविणारा अर्थात काजू, काकडी, बेकरीचे पदार्थ, थंड पाणी, रासायनिक पदार्थ असलेले हबाबंद पदार्थ, खव्याचे पदार्थ, उसाचा रस टाळावा. याशिवाय गार हवेत झोपणे, थंड वारा अंगावर घेणे, गोड खाल्ल्या नंतर पाणी घेणे, दुपारी जेवणानंतर लगेच झोपणे हे टाळावे.आहारात वेलची, तमालपत्र, दालचिनी, लवंग, आले, लसूण, मोहरी, केशर ह्यांचा उपयोग अधिक प्रमाणात वापर करावा. सतत गरम पाण्याने हात धुवावे. तोंड सुती कपड्याने सुरक्षित करणे, नाकामध्ये आतील बाजूला शुद्ध गाईचे तूप लावणे, रात्री डोक्‍याला तेल लावून झोपावे. 


दम्याची लक्षणे 
-श्‍वास घेण्यास त्रास 
-खोकला, सर्दी, ऍलर्जीने सुरुवात 
-छातीत तणाव निर्माण होणे 
-श्‍वास घेतांना घाबरल्यासारखे होणे 
-श्‍वास घेताना घाम येणे 


]
दमा आजार नियंत्रित करणारी औषधं नियमित घेतल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकते. अस्थमाच्या रुग्णांनी पहिल्यापासूनच इंफ्लुएंजा आणि न्यूमोकॉक्कल लसीकरण करून घ्यावे. अस्थमाच्या रुग्णांनी घरातील लोकांसोबत सोशल डिस्टेंसिंग ठेवायला हवं. 
-डॉ. आकाश बल्की, अस्थमा रोगतज्ज्ञ, नागपूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT