file photo 
नागपूर

Video : विश्व महायुद्धाचे भाकित वर्तविल्याने खळबळ... वाचा संपूर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पाच जून ते पाच जुलै या एक महिन्याच्या काळात दोन चंद्रग्रहण आणि एक कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. त्यातील एक चंद्रग्रहण शुक्रवारी (ता. 5) झाले. हा प्रकार संपूर्ण विश्‍वासाठी अत्यंत चिता वाढविणारा ठरणार आहे. ग्रहांचे वक्रीपण देशात नैसर्गिक आपत्तीजनक परिस्थिती निर्माण करेल. काही भागात ओला दुष्काळ पडेल. जागतिक मंदीच्या तडाख्यात कित्येक देश होरपळले जातील.

भारताच्या अर्थव्यवस्थेवर जबरदस्त विपरीत परिणाम पडणार आहे. त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे भाकीत आंतरराष्ट्रीय ज्योतिष्याचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी केले आहे. एखाद्या नेत्याच्या अहंकारामुळे जगाला विश्‍वयुद्धाच्या दिशेने जावे लागेल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.



पाच जूनला रात्रीचे माद्य चंद्रग्रहण भारतातून दिसले. ग्रहण मोक्ष सहा जून रोजी पहाटे 2.34 मिनिटांनी झाला. माद्य चंद्रग्रहणाच प्रत्यक्ष ग्रास होत नसून चंद्रबिंब फक्त थोडे धूसर होते. सध्या गुरू आणि शनी दोन्ही ग्रह अस्त आहेत. त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. एखाद्या यशस्वी कीर्तिमान नेत्याची हत्या झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको, काही देशातील नेत्यांच्या हटवादीपणा व खोट्या अहंकारामुळे जगाचे विश्‍वयुद्धाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल, असेही संकेत त्यांनी दिले आहे.

21 जुलैला कंकणाकृती सूर्यग्रहण

रविवार 21 जुलै रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण राहणार आहे. भारतातील दक्षिणेकडील काही भागातून हे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. आशिया खंडातील काही देश आफ्रिका, दक्षिण युरोप व पॅसिफिक महासागरातून ते दिसेल. या ग्रहणाचे वेध मात्र 20 जूनपासून म्हणजे शनिवारी रात्री 9 वाजून 40 मिनिटानंतर सुरू होतील. त्यामुळेच 20 जून रोजी सकाळी पाच वाजेपर्यंत बाल, वृद्ध रोगी यांनी काळजी घ्यावी. वृषभ, कर्क, मिथुन राशींना त्रासदायक राहील.

जगात जबरदस्त विपरित परिणाम

हे ग्रहण ज्येष्ठ महिन्यात असल्याने सत्ताधारी वर्गाला त्रासाला सामोरे जावे लागण्याचे योग आहेत. या दिवशी महत्त्वाचे सहा ग्रह एकाच वेळी चाल बदलून वक्री राहणार आहेत. यात बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू यांचा समावेश असल्यामुळे जगात जबरदस्त काही तरी विपरित परिणाम दिसून येतील. जगात एकप्रकारे खळबळ माजेल, असा दावाही वैद्य यांनी केला आहे.


तीन ग्रहणांमुळे राज्य नैसर्गिक आपत्तीत

या ग्रहणांच्या मालिकेतील तिसरे ग्रहण पण चंद्रालाच लागणार आहे. रविवार पाच जुलैला हे माद्य चंद्रग्रहण मात्र, भारतातून दिसणार नाही. तरीपण भारतीय वेळेनुसार ग्रहण स्पर्श रात्री 8 वाजून 37 मिनिटांनी होणार आहे. ग्रहणमोक्ष रात्री 11 वाजून 2 मिनिटांनी होणार आहे. पाच जुलैच्या माद्य चंद्रग्रहणानी भारतात मोठे परिवर्तन होतील. गुरू धनू राशीत परत आलेला वक्रीच राहणार आहे. शुक्र ग्रह नुकताच मार्गी झालेला असून यावेळी महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल. एका महिन्यात येणारे हे तीन ग्रहणे देशाला तसेच संपूर्ण विश्‍वालाच प्रगती व विकासासाठी तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एक अडचणच निर्माण करतील, असे डॉ. वैद्य यांचे भाकीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT