Atrocities from Facebook friends Forced abortion 
नागपूर

फेसबुक फ्रेंडकडून अत्याचार; बळजबरीने करवून घेतला गर्भपात

योगेश बरवड

नागपूर : फेसबुक फ्रेंडने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अभियंता युवतीचे सुमारे सहा महिने लैंगिक शोषण केले. यादरम्यान गर्भधारणा झाली असता बळजबरीने गर्भपात करवून घेतला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौरभ अंबादे (२६) असे आरोपीचे नाव आहे.

मूळचा वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील राहणारा असलेला आरोपी सध्या गोधनी बसस्थानकाजवळ राहतो. २३ वर्षीय पीडितसुद्धा वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली असून, त्यासाठी नागपुरात राहते. जुलै २०२० मध्ये आरोपीने पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. तिने सहजतेने ती स्वीकार केली. हळुहळू दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. अल्पावधीतच मोबाईल क्रमांकाचे आदान-प्रदानही आणि बोलणेही सुरू झाले.

मानकापुरातील फ्लॅटवर झालेल्या एका भेटीदरम्यान लग्नाचे आमिष दाखवत त्याने लैंगिक शोषण केले. सततच्या संबंधांमुळे पीडितेला दिवस गेले. आरोपीने दबाव टाकत गर्भपात करून घेण्यास बाध्य केले. फेब्रुवारी २०२१ नंतर त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला. आरोपीने तिला टाळणे सुरू केले. आपला फक्त वापर करून घेण्यात आल्याचे लक्षात येताच पीडितेने मानकापूर ठाणे गाठून कैफियत मांडली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आता स्टेजवर ब्लाऊजची बटणं काढली जातायेत" वाढत्या डीजे शोबाबत मेघा घाडगेंचा खळबळजनक खुलासा

Instagram Teleprompter Feature: आता Reels बनवणं होणार अगदी सोपं! Instagramचं नवं फीचर चर्चेत; 'असं' वापरलं तर झटपट वाढतील फॉलोवर्स

मनिषा हवालदारने शाळेतूनच काढल्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या प्रिंट आउट; NEET-UG २०२६ पेपरफुटी प्रकरणात नवा खुलासा!

११ कोटी कमावणाऱ्या 'देऊळबंद २'चं बजेट किती आहे माहितीये? ३ दिवसात वसूल केले बजेट?

Latest Marathi News Live Update : महागाईच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारमध्ये आंदोलन; राज्यभरात राजकीय वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT