नागपूर

अमरावतीच्या कुंभारगावात बीडीसाठी खून; क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये झटापट

संतोष ताकपिरे

अमरावती : रात्री दहाच्या सुमारास गावातील एका व्यक्तीच्या घरी बिडी मागण्यासाठी गेल्यामुळे दोघांमध्ये वाद (Argument between the two people for bidi) झाला. त्यात एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. रहिमापूर पोलिसांनी सायंकाळी खुनाचा गुन्हा (Murder in Amravati) दाखल केला. सुरेश तुकाराम रायबोले (वय ६०, रा. कुंभारगाव, रहिमापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रायबोले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Attack-for-BD-in-Kumbhargaon-at-Amravati)

दिनेश गौतम खंडारे (वय २९, रा. कुंभारगाव) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. खंडारे हे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास बिडी मागण्यासाठी रायबोले यांच्या घरी गेले होते. रात्री बिडी मागण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. त्यात प्रकृती गंभीर झाल्याने रायबोले यांना उपचाराकरिता गुरुवारी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यापूर्वी जखमी रायबोले यांनी रहिमापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्याआधारे पोलिसांनी दिनेश खंडारेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. परंतु, उपचारादरम्यान सुरेश रायबोले यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयित आरोपी दिनेश खंडारेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी

प्रतिस्पर्धी व्यक्तीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी छत्रितलाव नजीकच्या जेवडनगरात खून करण्यात आल्याची माहिती राजापेठ पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. खूनप्रकरणात एकूण चौघांना अटक झाली असून, न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शनिवारी अटकेतील राजेश अशोक थोरात, अतुल सुभाष तुपाडे, प्रतीक कांबळे आणि अनिल चंपत डोळे अशा चौघांना राजापेठ पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते. शुक्रवारी दुपारी दोन ते सवादोनच्या सुमारास छत्रीतलावाजवळ झुडपात दगडाने ठेचून अशोक उत्तम सरदार (वय 35) यांचा खून झाला होता. (Attack-for-BD-in-Kumbhargaon-at-Amravati)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

SCROLL FOR NEXT