attack on man due to fight on rash driving  
नागपूर

युवकावर प्राणघातक हल्ला; वाहनाची तोडफोड; भरधाव वाहन चालविल्याचा वाद

अनिल कांबळे

नागपूर ः भरधाव वाहन चालविणाऱ्या युवकाला फटकारल्यावरून झालेल्या भांडणात ८ आरोपींनी एका युवकावर प्राणघातक हल्ला करीत परिसरात उभ्या वाहनांची तोडफोड केली आणि फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी गोंडपुरा, पाचपावली निवासी रत्नमाला देवराव मसराम (५५) च्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा नोंदविला. आरोपींमध्ये वस्तीत राहणारा शुभम बारापात्रे (३०) आणि त्याच्या साथीदारांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकरा वाजतादरम्यान रत्नमाला मसराम या वस्तीतील लोकांशी बोलत उभ्या होत्या. त्याचवेळी आरोपी शुभम बारापात्रे दुचाकीने भरधाव त्यांच्याजवळून गेला. अचानक घडलेल्या या प्रकाराने त्या दचकल्या. त्यांनी शुभमला वस्तीतून भरधाव वाहन चालविण्यावरून फटकारले. 

यामुळे चिडलेल्या शुभमने त्यांच्याशी वाद घातला. आईसोबत भांडण होताना पाहून रत्नमाला यांचा मुलगा विशाल (२८) हा आरोपीची समजूत काढण्यासाठी आला. मात्र, आरोपीने त्याच्याशीही भांडण सुरू केले. या दरम्यान वस्तीतील लोक गोळा होताना पाहून शुभमने तेथून पळ काढला. काही वेळाने तो आपल्या आठ साथीदारांसह पुन्हा परतला. 

सर्वांच्या हातात लाकडी दांडे होते. आरोपींनी विशालला जबर मारहाण केली. त्याच्या डोक्यावर दांड्याने वार करून गंभीर जखमी केले. यानंतर आरोपींनी परिसरात हैदोस घालत वाहनांची तोडफोड केली आणि फरार झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. जखमी विशालवर उपचार सुरू आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अशोक खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू

Prashant Raut Memorial: तुझ्यामुळे ‘सरणा’साठी जागा मिळाली, स्मारकासाठी आम्ही अपयशी; दोन दशकापासून ‘शहीद प्रशांत राऊत’ स्मारकासाठी उदासीनता!

SCROLL FOR NEXT