Attendance allowance of two lakh students closed 
नागपूर

दोन लाख विद्यार्थिनींचा ‘उपस्थिती भत्ता’ बंद; शिक्षण संचालकांनी काढला अजब आदेश

मंगेश गोमासे

नागपूर : कोरोनामुळे यंदा ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शाळा बंद असल्याने इयत्ता पहिली ते चौथीच्या दोन लाख विद्यार्थिनींसाठी सुरू असलेल्या ‘उपस्थिती भत्ता’ योजनेचा लाभ देऊ नये, असा अजब आदेश प्राथमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी काढला आहे. राज्यातील विद्यार्थिनींवर अन्याय करणारा निर्णय आहे. या निर्णयामुळे सावित्रीच्या लेकींची थट्टा होत असल्याने शिक्षक संघटनांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे.

मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींना प्रतिदिन प्रत्येक मुलीमागे १ रुपया या दराने उपस्थिती भत्ता १९९२ पासून देण्यात येतो. परंतु, २२ फेब्रुवारीच्या शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या पत्रान्वये मागील वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू असून शाळा बंद आहे. निव्वळ या कारणामुळे महाराष्ट्रातील २ लाख मुलींचा उपस्थिती भत्ता बंद करण्यात आला आहे.

मुळात मुलींची शिक्षणातील आवड वाढावी, त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी ही योजना आहे. त्यामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने मुलींची उपस्थिती ही ग्राह्य धरायला हवी. असे असतानाही एक रुपये प्रतिदिन देण्यात येणारी योजना बंद करण्यात आल्याने शासनाची ही कृती म्हणजे इयत्ता पहिली ते चौथीच्या निरागस विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित करणारी आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात मुलींवर हा अन्याय होत असून समाजात प्रचंड असंतोष निर्माण करणारा आहे.

भाजप शिक्षक आघाडीकडून निषेध

सरकारच्या शिक्षण विरोधी कृतीचा भाजप शिक्षक आघाडीकडून निषेध केला असून, विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता तत्काळ सुरू करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सरकारकडे मंत्र्यांना आरामदायक गाड्या घ्यायला करोडो रुपये आहेत, पण मागासवर्गीय मुलींना प्रतिदिन १ रुपया द्यायला पैसे नाहीत का? असा सवाल संघटनेचे विभागीय संयोजक अनिल शिवणकर यांनी केला. तत्काळ उपस्थिती भत्ता सुरू न केल्यास भाजप शिक्षक आघाडी आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT