Babasaheb Ambedkar`s birthday were celebrated in this way 
नागपूर

Video : 'आंबेडकर विशेषांक' प्रकाशित करून साजरा केला होता बाबासाहेबांचा वाढदिवस

केवल जीवनतारे

नागपूर : प्रज्ञासूर्य, करुणाकर, कायदेपंडित, घटनातज्ज्ञ, राज्यशास्त्री, अर्थशास्त्री, समाजशास्त्री असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आजघडीला बाबासाहेबांची जयंती जगभरात साजरी होते. परंतु, बाबासाहेब हयात असताना त्यांचा वाढदिवस साजरा केला होता, हे अनेकांना माहीत नसेल. लोकलढ्यातून अस्पृश्‍य "जनते'ला संघटित करण्याचे अभियान चालविणाऱ्या "जनता' पाक्षिकाने 1949 साली "आंबेडकर विशेषांक' प्रकाशित करून 57 वा वाढदिवस साजरा केला होता. 

समता, बंधुत्व, न्याय, हक्क, अधिकाराचे महत्त्व पटवून सांगणारे डॉ. बाबासाहेब यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त "जनता' पाक्षिकातून "जनता'चे संपादक बापू चंद्रसेन कांबळे यांनी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतायू होवोत' हा अग्रलेख लिहिला होता. तर या विशेषांकामध्ये प्रो. श्री. म. माटे, श्री. काणेकर, श्री. नवरे, श्री. वि. गाडगीळ, प्रो. ओतुरकर, प्रो. सत्यघोष हुदलीकर यांनी बाबासाहेबांचे जीवनचरित्र आणि त्यांचा संघर्ष सांगणारे लेख लिहिले होते.

दादर येथील "भारत भूषण' प्रिंटिंग प्रेसमध्ये हा अंक छापण्यात आला होता. विशेष असे की, "डॉ. आंबेडकर यांच्या मंत्रिपदाचा अर्थ' हा प्रो. श्री. म. माटे यांनी लिहिला असून कोणताही समाज सिंकदर केव्हा आणि कसा बनतो याचे विश्‍लेषण या लेखातून त्यांनी केले होते. तर श्री. रणपिसे यांनी "मराठी वाङ्‌मय आणि आंबेडकरी संप्रदाय' असा लेख बाबासाहेबांवर लिहिला होता. श्री. वि. गाडगीळ यांनी बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त 14 एप्रिल 1949 रोजी प्रकाशित अंकात "बाबासाहेबांच्या "शूद्र पूर्वी कोण होते?' ग्रंथाचा परिचय देणारा लेख लिहिला होता.

"अस्पृश्‍य कोण होत व ते अस्पृश्‍य झाले? या मथळ्याखाली हा लेख लिहिला होता. पा. ना. राजभोज यांनी "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे श्रेष्ठत्व' हा लेख लिहिला होता. या लेखातून मानवाच्या मुक्ततेचा नवीन धर्म असा आशय या लेखातून पुढे आणला होता. 

दिव्य दृष्टीचे डॉ. आंबेडकर 

या विशेषांकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र मुकुंदराव आंबेडकर यांनी "दिव्य दृष्टीचे डॉ. आंबेडकर' हा लेख लिहिला होता. या लेखातून मुकुंदराव यांनी विद्येची कमाई, अस्पृश्‍यांची छाती फुगली, अशा आशयातून बाबासाहेबांची दृष्टी ही भविष्याचा वेध घेणारी होती, असे या लेखातून स्पष्ट केले होते. या अंकाचे सामूहिक वाचन झाले होते, असे धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांचे पुतणे शेखर गोडबोले यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. पुढे जनता या पाक्षिकाचे "प्रबुद्ध भारत' असे नामकरण करण्यात आले होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT