Bad women are trying to do fraud with men by doing video call  
नागपूर

सावधान! ऑनलाईन देहव्यापाराचा नवीन फंडा; ‘लाईव्ह व्हिडीओ कॉलिंग नंतर होऊ शकते फसवणूक

अनिल कांबळे

नागपूर ः सेक्स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरूणींनी देहव्यापाराचा नवीन फंडा आखला आहे. आंबटशौकीनांना हेरून वॉट्सॲप किंवा फेसबूकवरून ‘लाईव्ह व्हिडिओ कॉलींग आणि सेक्स चॅटिंग’ करून पैसे कमावत आहेत. तरूणींच्या या आमिषाला अनेक जण बळी पडत असून या व्यवसायात शेकडो तरूणी गुंतल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक आंबटशौकीनांना देहव्यापारातील तरूणी हेरतात. त्यांच्याशी मैत्री करून फेसबूक किंवा वॉट्सॲपवरून चॅटींग करतात. पैसा कमविण्यासाठी नवनवीन शक्कल शोधून काढतात. त्यासाठी व्हिडीओ कॉलींगचा फंडा सध्या चालत आहे. अनेक तरूणी थेट फेसबूकवर खुलेआम सेक्स चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलींगसाठी आमंत्रण देतात. 

चक्क फेसबूकमधील स्टोरीमध्ये अर्धनग्न व्हिडीओ आणि मादक, कमी कपड्यात फोटो टाकतात. त्यावर वॉट्सॲप क्रमांक देण्यात येतो. त्या क्रमांकावर चॅटिंग केल्यानंतर गूगल पे किंवा फोन पे क्रमांक दिल्या जातो. १० मिनिट लाईव्ह व्हीडिओ चॅटींगचे ३०० रूपये आकारण्यात येते. पैसे जमा केल्याचा स्क्रीन शॉट पाठविल्यानंतर तरूणी लाईव्ह व्हिडीओ कॉल करते. त्यामध्ये अश्‍लील संभाषण आणि मनमर्जी व्हिडिओ कॉलींग करण्यात येते. दहा मिनिटाचा वेळ संपताच ‘बाय...पुन्हा भेटूया...’ असे बोलून कॉलगर्ल फोन कट करते. सध्या अशाप्रकारे देहव्यापारातून वारांगणा पैसे कमवित असल्याचा प्रकार समोर आला आहे.

वारंवार कॉल आणि मॅसेज

स्मार्टफोनधारकाने एकदा ३०० रूपये भरून व्हिडिओ कॉलिंग केल्यानंतर त्याला तरूणी वारंवार मॅसेज करते. तसेच स्वतःचे अर्धनग्न आणि अश्‍लील फोटो वॉट्चॲपर पाठवून आकर्षीत करण्याचा प्रयत्न करते. तसेच त्या व्यक्तीला वारंवार फोन करून ‘ऑनलाईन कब आ सकते हो’ अशी विचारणा करीत असल्याची माहिती एका युजरने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

ब्लॅकमेलिंगपासून सावधान

अश्‍लील चॅटिंग आणि व्हिडिओ काल केल्यानंतर ती तरूणी स्वतःचा स्मार्टफोन स्क्रीन रेकॉर्डर मोडवर ठेवू शकते. तसेच आपण अश्‍लील चॅटिंग केल्याचे स्क्रिन शॉटही सेव्ह करू ठेवू शकते. तिला पैसे न दिल्यास ते सर्व व्हिडिओ आणि स्क्रीन शॉट सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ शकते. त्यामुळे अशा ब्लॅकमेलिंग करणाऱ्या तरूणींपासून सावधान राहण्याची गरज आहे.

स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे अनेक तरूणांना आकर्षित करण्यासाठी तरूणी वेगवेगळे फंडे वापरू शकते. त्यामुळे कुणीही सोशल मिडियावर अश्‍लील चॅटिंग किंवा कृत्य करू करू नये. हा प्रकार कायद्याने गुन्हा आहे. कुणाची फसवणूक झाली असल्यास किंवा कुणाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी सायबर क्राईमकडे लेखी तक्रार करावी. नाव गुपित ठेवून तक्रारींवर कारवाई केल्या जाईल.
- केशव वाघ, 
सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम, नागपूर पोलिस.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT