bail granted to former chief minister Devendra Fadnavis granted bail
bail granted to former chief minister Devendra Fadnavis granted bail 
नागपूर

Video : म्हणून देवेंद्र फडणवीसांना चढावी लागली कोर्टाची पायरी, लिहून द्यावे लागले हे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाने शेवटची संधी देत गुरुवारी (ता. 20) न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार देवेंद्र फडणवीस न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाले. सुनावनीनंतर फडणवीस यांना 15 हजारांच्या जात मुचलक्‍यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे. 

2014 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपविल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज ऍड. सतीश उके यांनी न्यायालयात केला होता. फडणवीस मुंबई येथे झालेल्या व्यवसाय समितीच्या बैठकीत व्यस्त असल्यामुळे मागच्या सुनावनीत न्यायालयात उपस्थित राहू शकले नाही. यामुळे पुढील तारीख देण्याची विनंती ऍड. उदय डबले यांनी न्यायालयाला केली होती. 

यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यानसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अनुपस्थित राहण्याबाबत मुभा देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने न्यायालयाने फडणवीस यांना शेवटची संधी देत या प्रकरणावर गुरुवारी (ता. 20) सुनावणी ठेवली होती. ऍड. सतीश उके यांनी अर्जाद्वारे केलेली विनंती सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने मान्य न केल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. 

ऑक्‍टोबर 2019 मध्ये सुनावणी दरम्यान प्रकणावर सत्र न्यायालयाने पुन्हा सुनावणी घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. ऍड. उकेंनी दाखल केलेल्या अर्जामध्ये असे म्हटले आहे की, 2014 सालची विधानसभा निवडणूक लढवताना फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपविली. 

देवेंद्र फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी विनंती ऍड. उकेंनी केली. त्यानुसार, न्यायालयाने फडणवीस यांना समन्स बजावत न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गुरुवारी न्यायालयात हजर झाले. सुनावनीनंतर फडणवीस यांना 15 हजारांच्या जात मुचलक्‍यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे. 

न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्‍वास 
जनतेसाठी केलेल्या आंदोलनांमुळे काही गुन्हे दाखल झाले होते. लोकांसाठी संघर्ष करताना दाखल झालेली सर्व प्रकरणे आहेत. निवडणुकांमध्ये प्रक्रियेवर परिणाम करतील, असे कुठलेही गुन्हे मी लपविलेले नाहीत. ज्या गुन्ह्यांसाठी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले, ती 1993 ते 1998 दरम्यानची आहेत. दोन खासगी प्रकरणे दाखल करण्यात आली होती आणि ती निकालीही निघाली होती. या दाखल प्रकरणी सर्व माहिती न्यायालयाला देऊ, न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. यामागे कोण आहे याचीही आपल्याला कल्पना आहे. परंतु, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आता त्यावर जास्त बोलणे योग्य नाही. 
- देवेंद्र फडणवीस, 
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT