bank branch shifted to other from pipla kinkhede in kalmeshwar of yavatmal
bank branch shifted to other from pipla kinkhede in kalmeshwar of yavatmal 
नागपूर

गावातील बँक दुसरीकडे स्थलांतरित, व्यवहार करायचा कसा?

विजयकुमार राऊत

कळमेश्वर (जि. नागपूर) : तालुक्यातील पिपळा किनखेडे येथे कार्यरत असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेने स्थानिय खातेदारांना कुठलीही पूर्वसूचना न देताच अचानक धापेवाडा येथे शाखा स्थलांतरित केली. त्यामुळे ग्रामस्थांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मागील सहा वर्षांआधी पिपळा (किन.), कन्याडोल, कोकर्डा, मडासावंगी, वाढोणा ( खुर्द), परसोडी, मोहगाव, पानउबाळी अशा आठ गावांतील नागरिकांना मोहपा, धापेवाडा येथील बँकांमध्ये ७ ते ८ किलोमीटरची पायपीट करीत व्यवहार करावा लागायचा. २०१५ मध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेने पिपळा किनखेडे येथे शाखा स्थापन केल्याने या आाठही गावातील नागरिकांना व्यवहार करणे दिलासादायक झाले होते. या बँकेत परिसरातील सुमारे साडेचार हजार खातेधारकांनी खाते उघडून नियमित लाखोंचा व्यवहार केला. मात्र, बँकेने ग्राहकांना कुठलीही पूर्वसूचना न देता धापेवाडा येथे शाखा स्थलांतरित केली. यामुळे शेतकरी, महिला, वृद्धापकाळ योजनेतील वृद्ध, विद्यार्थी आदींनी बँकेप्रति रोष व्यक्त केला आहे. धापेवाडा येथे ही बँक शाखा पूर्वसूचना न देता स्थलांतरित होत असल्याने खातेदारांनी खाते बंद करुन पैसे परत घेण्यासाठी रांग लावली. परंतु, बँक व्यवस्थापन पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या भागात एकतर दुसरी बँक तत्काळ सुरू करा किंवा या बँकेचे दुसरीकडे होत असलेले स्थलांतरण थांबवा, अशी मागणी सरपंच शिल्पा वानखेडे, उपसरपंच प्रशांत कापसे, अमोल फुलारे, अशोक तरारे, वंदना सेवतकर आदी ग्रामस्थांनी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT