grain. 
नागपूर

पोषण आहारासाठी विद्यार्थ्यांना बोलवले जातेय शाळेत... येथे सुरू आहे हा भयानक प्रकार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागात शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्या जीव धोक्यात घालण्याचे काम शाळांकडून करण्यात येत आहे.
शाळांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सुटयादरम्यान गरजू विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करायचे आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडून तसे आदेश शाळांना आहेत. आतापर्यंत ग्रामीण भागात शालेय पोषण आहार वाटप सुरू होते. आता शहरी भागातील शाळांमध्ये पोषण आहार वाटप करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकाच वेळी बोलावून घेतल्याने गर्दी होते आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे नागसेन विद्यालयात पोषण आहार घेण्यास गर्दी झाली होती. यादरम्यान सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येत नसल्यामुळे आरटीई ऍक्शन समितीचे अध्यक्ष शाहिद शरीफ यांनी पोलिस आयुक्त आणि जरीपटका पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.  यानंतरही बऱ्याच शाळा विद्यार्थ्यांना पोषण आहारासाठी बोलावित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वीच शहरातील विविध भागात कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका वाढतो आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना बोलाविणे कितपत योग्य आहे हे कळायला मार्ग नाही.
सविस्तर वाचा - दारूला शोधला हा पर्याय; दारुड्यांची नवी शक्कल
पालकांना बोलावणे योग्य
पोषण आहाराचे वाटप करायचे असल्यास विद्यार्थ्यांऐवजी त्यांच्या पालकांना बोलवावे अशी मागणी आरटीई ऍक्शन समितीचे अध्यक्ष शाहिद शरीफ यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mastani Lake Water Shortage : ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा निम्माच पाणीसाठा; कमी पावसामुळे वडकीवर टंचाईचे संकट, वन्यजीवांचे स्थलांतर वाढणार

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Mula Dam Wate : मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडले; नदीपात्रात २,५०० क्यूसेकने पाणी सोडले

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Harnai Palande Beach Seagull : दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन! हर्णै-पाळंदेमध्ये झळकले 'सीगल' पक्षी, युरोपमधील वाढत्या तापमानाचा परिणाम?

SCROLL FOR NEXT