bhavani dham 1000 ghatasthapana Sakal
नागपूर

Ghatasthapana 2023 : भवानी धाम चौकीगडला होणार हजार घटांची स्थापना

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चाकडोह बसस्थानकापासून ६ किमी अंतरावर वेणा नदीच्या उगमस्थळी भवानी मातेचे विलोभनीय मंदिर

सकाळ वृत्तसेवा

धामणा (लिंगा) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चाकडोह बसस्थानकापासून ६ किमी अंतरावर वेणा नदीच्या उगमस्थळी भवानी मातेचे विलोभनीय असे मंदिर आहे. नागपूरचे भोसले राजे हे लढाईला जाण्याआधी येथे दर्शनासाठी येत असल्याचे सांगितले जाते. प्राचीन वारसा असलेल्या या उद्‍ध्वस्त मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला.

प्राचीन शिल्प, जुन्या मंदिराचे अवशेष व मूर्ती येथे आजही पहावयास मिळतात. या जागेला चौकीगड असे संबोधल्या जाते. दरवर्षी नवरात्रोस्तवाला हजारो भक्त मातेचा आशीर्वाद घेतात. वेणा नदीचा उगम माहादागड टेकड्यांत चौकीगड येथे होतो.

वेणा नदीच्या उगम स्थानाजवळ भवानी मातेचे भव्य असे मंदिर आहे.दरवर्षी येथे अखंड ज्योत प्रज्वलित करून नवरात्री उत्सवास प्रारंभ होतो. राज्यातूनच नव्हे तर विविध राज्यातून व विदेशातूनही भाविक देणगी पाठवून आपल्या नावाची अखंड मनोकामना ज्योत लावत असतात. चौकीगड भवानी माता देवस्थान निसर्गाच्या सानिध्यात व दुर्गम अशा स्थळी असल्याने भाविकांसाठी निवास, भोजनालयाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

या वर्षी नवरात्रोत्सवात गरबा, माता जागरण, गोंधळ व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी व्यवस्थापक मंडळ कामाला लागल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त बालुभाऊ सावल यांनी दिली.

स्वातंत्र्यपूर्वीपासून घटस्थापनेची परंपरा अबाधित

केळवद : येथिल बाजार चौकातील हनुमान-महादेव मंदिरात १९२६ पासून घटस्थापनेला प्रारंभ करण्यात आला होता. आज ९७ वर्षांपासून ही परंपर अबाधित असून यंदाही नवरात्री उत्सवानिमित्त येथे घटस्थापना, अखंड हरीनाम सप्ताह, अखंड घंटानाद, भागवत कथा, काकडा, हरीपाठ यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,

येथील शंकरराव लोहे यांच्या वतीने माधवनाथ महाराज आर्वी यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर कोल्हे, अशोक कामडी, सुरेश गव्हाणकर, वल्लभदास गांधी, गोस्वामी महाराज, यशवंतराव विंचूरकर, विजय सौदागर, हरीभाऊ येणुरकर यांच्यासह आयोजक कमिटी परीश्रम घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT