Biggest drug dealer Chanda Thakur arrested by Nagpur police
Biggest drug dealer Chanda Thakur arrested by Nagpur police  
नागपूर

‘लेडी डॉन’ सर्वात मोठी ड्रग्स तस्कर चंदा ठाकूरला ठोकल्या बेड्या; नागपूर पोलिसांची कारवाई

अनिल कांबळे

नागपूर ः शहरातील ‘लेडी डॉन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्वात मोठी ड्रग्स तस्कर चंदा ठाकूरला अखेर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. तिला पोलिसांनी कळमन्यातील घरातून अटक केली. चंदावर आतापर्यंत ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदा ठाकूर ही गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना ‘वॉंटेड’ होती. तिच्यावर एमडी, हेरॉईन, ब्राउनशुगर आणि गांजासह दारू तस्करीचे अनेक गुन्हे आहेत. यासोबतच पोलिस पथकावर हल्ला केल्याचाही गुन्हा चंदावर दाखल आहेत. 

अमली पदार्थ विरोधी पथकातील काही पोलिस कर्मचाऱ्यांशी चंदाचे मैत्रीपूर्ण आणि ‘घरगुती’ संबंध असल्यामुळे तिचे ड्रग्स तस्करीत पाळेमुळे घट्ट झाले होते. घरात ‘तुलसी’चे झाड लावल्याचे दर्शवून ती गांजा पेरत होती. त्यामुळे तिचा पोलिस दलात चर्चा होत होती. 

अनेक प्रकरणात फरार असलेल्या चंदाच्या मागे पोलिस खूप दिवसांपासून लागले होते. मात्र काही पोलिस कर्मचारीच तिला टीप देत असल्यामुळे ती पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात नेहमी यशस्वी होत होती. आज गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांना चंदा बाबत टीप मिळाली. त्यांनी लगेच युनिट तीनचे पोलिस अधिकारी एपीआय योगेश चौधरी यांनी छापा घालण्याचे आदेश दिले. चंदा कळमन्यातील जुना कामठी रोड, सैफूल याच्या घराजवळील मकानमध्ये ती लपून बसली होती. 

पथकाने सापळा रचला. घराला बाहेरून कुलूप होते. त्यामुळे घरात कुणीही नसल्याचे चंदा भासवत होती. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चंदा शौचालयात लपून होती. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिला एनडीपीएस विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. चंदावर एका दारू तस्कराचा खून केल्याचाही गुन्हा दाखल आहे. ही कारवाई एपीआय योगेश चौधरी यांच्या पथकाने केली.

तुलसीची होणार चौकशी ?

वादग्रस्त असलेला टॅक्सीचालक तुलसीने चंदाला आपली कार गिफ्ट केली होती. चंदाच्या मुलीशी त्याची मैत्री होती. मैत्रीपोटी तो चंदाचे प्रतिस्पर्धी फिटविण्यासाठी तत्पर असायचा. चंदा पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून तिला टीप द्यायचा. तुलसीनेच नंदनवन ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांना फिटविल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता तुलसीची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संपादन -  अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टार- चित्रा वाघ

SCROLL FOR NEXT