२४ वर्षीय भावेशने सुवर्ण चतुष्कोन (गोल्डन कॉड्रीलॅटरल) नावाच्या या साहसी अभियानाची सुरूवात दिल्ली येथून २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता केली होती. 
नागपूर

क्या बात है! नागपूरचा भावेश 'इंडिया बुक'मध्ये; दुचाकीने केला सहा हजार किमीचा चतुष्कोन पूर्ण

नरेंद्र चोरे

नागपूर : नागपूरचा युवा बाईक रायडर भावेश साहू याने चार दिवसांत सहा हजार किमीचा सुवर्ण चतुष्कोन यशस्वीरीत्या पूर्ण करीत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये आपले नाव नोंदविले आहे. असा बहुमान मिळविणारा तो नागपूर व विदर्भाचा पहिला रायडर ठरला आहे.

२४ वर्षीय भावेशने सुवर्ण चतुष्कोन (गोल्डन कॉड्रीलॅटरल) नावाच्या या साहसी अभियानाची सुरूवात दिल्ली येथून २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता केली होती. लागोपाठ चार दिवस 'नॉनस्टॉप' बाईक चालवत दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबईमार्गे परत दिल्ली हे सहा हजार किमी अंतर त्याने ९१ तास १० मिनिटांत पूर्ण केले. 

हे अभियान ७५ तासांच्या आत पूर्ण करून नव्या भारतीय विक्रमासह प्रतिष्ठेच्या 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नाव नोंदविण्याचा त्याचा प्रयत्न होता. दुर्दैवाने मार्गात दुचाकी खराब झाल्याने त्याचे 'लिम्का बुक' चे स्वप्न अपूर्ण राहिले. शिवाय मुंबईच्या शोबित सरकारच्या नावावर असलेला ८७ तास ४२ मिनिटांचा विक्रमही त्याला मोडीत काढता आला नाही. मात्र 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नाव नोंदविण्यात तो यशस्वी ठरला.

या दिवसरात्र प्रवासादरम्यान भावेशने कुठेही मुक्काम न करता तब्बल १३ राज्यांतील ८२ शहरांमधून बाईक चालविली. खाणेपिणेही त्याने चालत्या बाईकवरच केले. सुरक्षेसाठी विशिष्ट सूट, सेफ्टी गिअर व जीपीएस सिस्टिमची मदत घेतली. या अभियानाच्या निमित्ताने त्याने भारतीयांना हेल्मेट घालण्याचा व सुरक्षित वाहने चालविण्याचा जागोजागी संदेश दिला. 

एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या भावेशने यापूर्वी भूतान, लद्दाख, नेपाळ, म्यानमार बॉर्डरपर्यंत बाईक राईड केले आहे. 'लिम्का बुक'ची संधी थोडक्यात हुकल्याबद्दल भावेशने नाराजी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी अभियान पूर्ण केल्याचा त्याला आनंदही आहे. भविष्यात नागपुरातील इच्छुक युवकांना या राईडसाठी मार्गदर्शन करणार असल्याचे त्याने सांगितले.

'मी आतापर्यंत अनेक राईड्स केल्या, मात्र हे अभियान माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. दिवसा उन्हाचा प्रचंड त्रास झाला. त्यात दुचाकीनेही वेळेवर दगा दिला. गाडी खराब झाली नसती तर नक्कीच हे अभियान ७५ तासांच्या आत पूर्ण करू शकलो असतो. 'लिम्का बुक' ची संधी अवश्य हुकली, पण 'इंडिया बुक'मध्ये नाव नोंदविण्यात यशस्वी ठरलो.'
-भावेश साहू,
 बाईक रायडर 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा कहर! १० जणांना चिरडले; २ ठार, ८ जण जखमी

IND vs ENG, 3rd T20I: पाऊस करणार गेम? भारत-इंग्लंड तिसऱ्या T20I सामन्यासाठी काय सांगतो नॉटिंगहॅमचा हवामान अंदाज?

Latest Marathi News Update : भीषण अपघात! नवी मुंबईत भरधाव कारने १० जणांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

Nanded: गुंठेवारी प्रमाणपत्रे आता घरबसल्या मिळणार ऑनलाइन; नांदेड मनपाची डिजिटल कारभाराकडे मोठी झेप, गैरप्रकारांनाही आळा बसणार

भुदरगडमध्ये मॅग्नेटिक पॉइंट? उताराऐवजी चढाच्या दिशेनं जाते न्यूट्रल गाडी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT