Bina sangam near Nagpur is still not emerging due to bad roads  
नागपूर

प्रसिद्ध बिना संगम तीर्थस्थळी भाविकांना सोयीसुविधांची प्रतीक्षा; महापुराने रस्त्याची झाली दुर्दशा

दिलीप गजभिये

खापरखेडा (जि. नागपूर) : बिना संगम येथील भोसलेकालीन शिवमंदिर परीसरात अनेक वर्षापासून भाविकांना सोयी सुविधांची प्रतीक्षा आहे. शिवाय मंदिरालगत खालच्या बाजूला कन्हान, पेंच, कोलार त्रिवेणी नद्यांचा संगम असून या प्रसिद्ध तीर्थस्थळाला शासनाचा 'क' पर्यटन स्थळ दर्जा मिळाला आहे. मात्र येणाऱ्या भाविकांना येथे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे भोसले घराण्याचे खाजगी शिवमंदिर असल्याचे बोलले जाते.

नदीला आलेल्या महापुराने मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग वाहून गेला. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर बिना संगम कोळसा खाण आहे. महापुराचे पाणी कोळसा खदानीत शिरल्याने पाणी काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागले.ज्यामुळे कोळसा उत्पादनावर मंदीचे सावट आले.

हा संगम अस्थिविसर्जनासाठी प्रसिद्ध असल्याने भाविकांची दररोज वर्दळ असते. बाराही महिने या परिसरात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. अधिक मासात त्रिवेणी संगमावर अंघोळीला येणाऱ्या महिलावर्गाची संख्या लक्षवेधी असून त्यांना कपडे बदलण्याची सोय सुद्धा नाही. त्याचप्रमाणे वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नाही. या तीर्थस्थळी अनेकदा अनुचित घटनाही घडल्याचे चित्र आहे.

महापुरामुळे मंदिर परिसरातील दुकाने वाहून गेली होती. त्यामुळे अनेकांना नुकसान सहन करावे लागले. कोरोना पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. सद्या मंदिर परिसरात सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो.

पोलिस चौकीची गरज

मंदिर क्षेत्र खापरखेडा पोलिस ठाण्याअंतर्गत येत असून सणासुदीच्या दिवशी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, दर रविवारी, ऋषिपंचमी, दसरा, दिवाळी आणि विविध सुट्ट्यांच्या दिवशी येथे तोबा गर्दी असते. तेव्हा पोलिसांचा बंदोबस्त लावला जातो. या मंदिर परिसरात अनेकदा अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस चौकीची मागणी होत आहे.

सुविधांचा अभाव दूर होणार का?

बिना संगम तीर्थस्थळाला शासनाच्या पर्यटन स्थळाचा " क " दर्जा प्राप्त असून हे स्थळ कामठी विधानसभा मतदारसंघात येते. इथल्या समस्यांकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष दिसून येते. नागरिकांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून येथील समस्या मांडल्या आहेत, मात्र अजूनही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : घनसावंगी पंचायत समितीच्या कामांमध्ये दुमजली कामाचा स्लॅबचा कॉलम पडून मुजराचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT