biteer by order of old, new administrator in gram panchayats 
नागपूर

आश्‍चर्य! पंचवीस जूनला अध्यादेश काढून झाले 25 दिवस, तरीही...

नीलेश डोये

नागपूर : ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा अध्यादेश सरकारने 25 दिवसांपूर्वीच काढला. तो त्याच दिवसापासून अंमलात आला. परंतु, अद्याप मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त झालेले नाहीत. जिल्हा परिषदांकडून विस्तार अधिकाऱ्यांनी प्रशासक पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे अध्यादेशाच्या तारखेनंतर विस्तार अधिकाऱ्यांचे आदेश, निर्णय अमलात कसे आणायचे? अध्यादेशाच्या तारखेपासून नवीन प्रशासकाच्या आदेशावर अंमल करायचा का, असे प्रश्‍न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. 

राज्यातील बारा हजारांवर ग्रामपंचायतींची मुदत संपली. कोरोनामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्‍य नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले. प्रशासकपदी योग्य व्यक्तीची निवड करण्याची कायद्यात सुधारणा करून 25 जूनला अध्यादेश काढला. अध्यादेश काढून आज 25 दिवसांचा कालावधी होत असून, अद्याप प्रशासकच नियुक्त झालेले नाही.

दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद सीईओंनी ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. जाणकारांच्या मते अध्यादेश निघताच प्रशासनाकडून नियुक्त प्रशासकाचे अधिकारी संपुष्टात आले. त्यामुळे त्यांचा निर्णय हा योग्य ठरणार नाही. कायद्यानुसार शासन नियुक्त प्रशासकच्या आदेशानुसार, स्वाक्षरीनुसार कारभार चालायला हवा. 

सरकारने अध्यादेश काढल्यानंतर दोन आदेश काढले. पालकमंत्र्यांच्या सूचनेने गावातील योग्य व्यक्तीची निवड करायची आहे. हा योग्यव्यक्ती गावातील मतदार हवा आहे. सरकारकडून अध्यादेश योग्यरित्या काढण्यात आला नसल्याने प्रशासक नियुक्त करण्यास विलंब होत आहे.

नवीन वाद निर्माण होण्याची शक्‍यता

सरकारच्या अध्यादेशामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सरकारला या संदर्भात सुस्पष्ट दिशानिर्देश करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पीएनजी कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था; बजाजनगरमध्ये उखडलेले रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिक त्रस्त

Pune News: शासन निर्णय लवकरच! प्रवेश रद्द केल्यास शुल्क परतावा अनिवार्य; राज्य शिक्षण आयुक्तांची माहिती, पालकांना दिलासा!

Rahuri Bypoll: प्राजक्त तनपुरे यांची माघार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई, अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा?

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये वृक्षतोडीला ब्रेक; राष्ट्रीय हरित लवादाकडून २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT