Congress-NCP Congress-NCP
नागपूर

काय ही स्थिती; काँग्रेस व राष्ट्रवादीला कोणी विचारेना!

भाजप सध्या बिनधास्त आहे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य गोवा, डेहराडून, काश्मीरला रवाना होत आहेत. दुसरीकडे कोणी विचारत नसल्याने आम्हाला बी जत्रेला येऊ द्या की रं.... अशी विनवणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना करावी लागत आहे.

विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे उमेदवार माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बाबवनकुळे यांनी मतदारांना सुरक्षित स्थळी रवाना केले आहे. नागपूरमध्ये भाजपचे १०८ नगरसेवक आहेत. रविवारपर्यंत ६२ नगरसेवक विविध राज्यांमध्ये रवाना झाले आहेत. ३३ नगरसेवकांची पहिली तुकडी गोव्यामध्ये दाखल झाली आहेत. त्यानंतर १६ नगरसेवक मध्यप्रदेशातील उज्जैन परिसरात देवदर्शनाला गेले आहेत. रविवारी रात्री १५ नगरसेवकांना काश्मीरमध्ये पाठवण्यात आले. सोमवारी रात्री साडेआठ आणि साडेअकराच्या विमानाने उत्तराखंडमध्ये काही नगरसेवक रवाना झाले आहेत.

विधान परिषदेची निवडणूक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि नगर पालिकेच्या सदस्यांसाठी मोठी पर्वणी असते. या निवडणुकीत मोठा घोडाबाजार होत असतो. त्यामुळे आपल्या मतदारांना सुरक्षित व अज्ञात स्थळी पाठविले जाते. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसने रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली असल्याने अनेक नगरसेवक पर्वणीच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रारंभिक बैठकीत जिल्हा परिषदेच्या सदस्यांना कुठे पाठवायचे यावर चर्चा झाली होती. एकमत होत नसल्याने जिल्हा परिषदेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर याचा निर्णय सोपवण्यात आला होता. त्यानंतर कोणीच नेता त्यांच्याकडे फिरकला नाहीत. कुठे जायचे, कसे जायचे आणि खर्च कोण करणार असा प्रश्न मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे काँग्रेसचे मतदार सदस्य बिनधास्तपणे जिल्ह्यातच फिरत आहे. त्यांच्यासोबत भाजपला संपर्क साधणेही सोपे आहे.

ग्रामीण भागात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे नेते पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार आहेत. त्यांच्यासोबत या विषयी बोलण्याची कोणाची हिंमत नाही. राष्ट्रवादीकडे नेतृत्वाचा अभाव आहे. राष्ट्रवादीकडे एकूण २७ मतदार आहेत. कोणीच विचारत नसल्याची त्यांचीही तक्रार आहे. त्यामुळे भाजप सध्या बिनधास्त आहे. सुमारे चारशे मते घेण्याचे नियोजन भाजपने केले आहे. काही दगाफटका झाला तरी सुमारे शंभर ते सव्वाशे मतांनी निवडणूक जिंकण्याचा भाजपचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणाच्या सांडव्यावरून 18,337 तर वीज गृहातून 1,050 क्युसेक विसर्ग; सहा वक्र दरवाजे चार फुटांवरून तीन फुटांपर्यंत आणले खाली

हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या लोकांना किती पैसे मिळतात? पंकज विष्णू यांनी सांगितला आकडा

Crime News: जिच्यावर प्रेम केलं तिच्यावरच संशय, दुसऱ्या तरुणासोबत पाहताच रागातून रॉडने हल्ला; हिंजवडीत रक्तरंजित थरार

Marathi News Live Updates : भंडारा येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चा

Sangli Solar Power Update : आता रात्री शेतात जाण्याची गरज नाही! 193 कृषी वाहिन्यांवर सौर वीज सुरू; 253 मेगावॉटचे प्रकल्प कार्यान्वित, पाहा संपूर्ण तपशील

SCROLL FOR NEXT