blackbird 
नागपूर

"ब्लॅक बिटन' रॉडसह उडाला आकाशात... वाचा काय आहे संपूर्ण प्रकार

सकाळवृत्तसेवा

नागपूर : सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये पायात रॉड टाकण्याची शस्त्रक्रिया करून तंदुरुस्त केलेला दुर्मीळ पक्षी "ब्लॅक बिटन'ने तब्बल 20 दिवसांची सुश्रूषा आणि पाहुणचारानंतर स्वतःहून आकाशात भरारी घेतली आहे. आकाशात भरारी घेताना त्याच्या पायातील रॉडचा भार घेऊन त्याने अचानक अधिवासात मुक्तसंचारास सुरुवात केली आहे. 

खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये विजेचा धक्का लागल्याने मृतपाय अवस्थेत असलेला हा पक्षी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणण्यात आला होता. तो आययुसीएनच्या लाल यादीतील दुर्मिळ पक्षी असल्याचे निदर्शनात आल्यानंतर डॉ सय्यद बिलाल व सिद्धार्थ मोरे यांनी प्रथमोपचार केले. दरम्यान, पाय तुटल्याचे लक्षात आल्याने एक्‍स- रे काढला आणि पायात रॉड टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवस अतिदक्षता कक्षात ठेवल्यानंतर बाहेर काढले.

तब्बल 20 दिवस ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमधील सुश्रृषा केल्यानंतर त्याचा पायात बळ आले. नवीन पाहूणचार उडू लागला होता. सरावासाठी मोठ्या पिंजऱ्यात ठेवले. आता पायातील रॉड काढल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचा विचार सुरू असतानाच त्यांनी स्वतःहून जाळीच्या छिद्रातून आकाशाकडे भरारी घेतली.

पक्ष्याच्या पायात रॉड आणि पिन आहे. डॉक्‍टरांच्या मते रॉड असला तरी त्याला त्याची अडताना अडचण होणार नाही. तो सहजरीत्या निसर्गाच्या सानिध्यात अधिवासात जीवन जगेल असा आशावाद व्यक्त केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: चार वेळा इंधन दरवाढीनंतर आज नवे दर जाहीर; तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने ७५ वर्षीय महिलेला उडवलं, चालक अपघातानंतर फरार

Chhatrapati Sambhajinagar: आडूळ बसस्थानकाचा कोंडला श्वास; रस्त्यावरच केल्या जातात दुचाकी-चारचाकी पार्क; कारवाईची नागरिकांकडून मागणी

कश्यपी धरणात चौघांना जलसमाधी! पतीसह गर्भवती पत्नी अन् शेजाऱ्यांची दोन मुले बुडाली; २ वर्षाच्या बाळामुळे घटना समजली

अक्षय कुमारचा नवा एलियन थरार! नव्या सिनेमाची केली घोषणा

SCROLL FOR NEXT