The body of the tractor driver was brought home 
नागपूर

२६ वर्षीय ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह आजोबाच्या अंगणात आणून टाकल्याने परिसरात खळबळ

सुनील सरोदे

कन्हान (जि. नागपूर) : २६ वर्षीय ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह येथून जवळच असलेल्या बोरडा येथील त्याच्या आजोबाच्या अंगणात आणून टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

मुळचा केरडी येथे राहणारा प्रदीप उर्फ झामा रोशन नितनवरे हा २६ वर्षीय युवक गेल्या काही वर्षांपासून बोर्डा येथे आजोबाच्या घरी राहत होता. टेकाडीच्या ट्रॅक्टर मालकाकडे चालक म्हणून तो नोकरी करीत होता. मंगळवारी (ता. १) रात्री दीड वाजताच्या सुमारास झामा नितनवरेचा मृतदेह त्यांचे आजोबा बळीराम मानवटकर यांच्या घराच्या छप्परीत ट्रॅक्टरमालक व अन्य तिघांनी आणून टाकला व तिथून निघून गेले.

ट्रॅक्टरचालक झामा नितनवरे याला घरच्या सदस्यांनी हलवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आजूबाजूच्यांना बोलावून झामाची तपासणी केली असता त्याचा श्‍वासोच्छवास बंद पडला होता. त्यामुळे बोरडा येथील माजी पोलिस पाटील श्रीराम नांदुरकर यांना बोलावून कन्हान पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले.

पहाटे सकाळी पाच वाजता कन्हान पोलिसांनी पोहोचून मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांना सोपविल्यावर मृतदेहावर सायंकाळी पाच वाजता बोरडा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. पुढील चौकशी सुरू आहे. झामा नितनवरे हा अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. ट्रॅक्टरवरून पडला तर दवाखान्यात न नेता ट्रॅक्टर मालकांने घरी का आणून टाकले, यावर शंका व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

साप्ताहिक राशिभविष्य : (१२ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६)

SCROLL FOR NEXT