नागपूर : विदर्भाला कला, संस्कृती, भाषा, स्थापत्य, उद्योजकता आदी अनेक क्षेत्रांत वैभवशाली सांस्कृतिक वारसा (vidarbha cultural history) लाभलेला आहे. मात्र, याचे अद्याप दस्त ऐवजीकरण झाले नाही. ‘विदर्भाचा सांस्कृतिक इतिहास’ या माध्यमातून पुणे येथील अनुबंध प्रकाशन हा प्रकल्प रुपी ग्रंथ प्रकाशित करणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी (Shripad Bhalchandra Joshi) हे या प्रकल्पाचे संकल्पक-संपादक आहेत. तर, ‘सर्वधारा’ या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक व समीक्षक डॉ. अजय देशपांडे हे या प्रकल्पाचे कार्यकारी संपादक आहेत. (book will come on vidarbha cultural history)
विदर्भ हा प्रदेश प्राचीन काळापासून आजतागायत सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध राहिला आहे. प्रदेशातील संस्कृती, सांस्कृतिक प्रतिभा, कार्य याची पुरेशी दखलच उर्वरित महाराष्ट्रात व देश विदेशात हवी तशी घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प संकल्पिला गेला आहे. २०२२ सालच्या सुरुवातीला हा ग्रंथ पूर्ण करण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंड (प्राचीन ते १९४७), स्वातंत्र्योत्तर कालखंड (१९४७ ते १९९०) आणि समकालीन कालखंड (१९९० ते २०२०) या तीन कालखंडातील संशोधन व आकलन हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
इतिहास लेखनात प्रादेशिक, विभागीय, स्थानिक इतिहासाचे महत्वाचे स्थान जगभर अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ‘विदर्भाचा सांस्कृतिक इतिहास’ आणि ‘मराठी वाङ्मयाचा वैदर्भीय इतिहास’ या दोन्ही अशा प्रकल्पांच्या लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. लवकरच हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होऊन ग्रंथरूपाने प्रकाशित होतील-डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ साहित्यिक, प्रकल्पाचे संकल्पक-संपादक
तज्ज्ञ मंडळी सहभागी -
विदर्भातील अकरा जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासाचे लेखन विदर्भातील भाषा, साहित्य व संस्कृतीचे स्थानिक अभ्यासक करीत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह व लेखक डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी नागपूर जिल्ह्याचा, सामाजिक कार्यकर्ते व लेखक नरेंद्र लांजेवार यांनी बुलढाणा जिल्ह्याचे, पत्रकार व लेखक विवेक चांदुरकर यांनी वाशीम जिल्ह्याचे लेखन पूर्ण केले आहे. अकोला जिल्ह्याचे लेखन वऱ्हाडी भाषेचे अभ्यासक डॉ. रावसाहेब काळे, भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे लेखन कवी, चित्रकार व समीक्षक प्रमोदकुमार अणेराव, अमरावती जिल्ह्याचे लेखन पत्रकार व लेखक प्रा. कुमार बोबडे, चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याचे लेखन प्रसिद्ध पत्रकार, श्रीपाद अपराजित, यवतमाळ जिल्हाचे लेखन इतिहास तज्ज्ञ डॉ. अशोक राणा, वर्धा जिल्ह्याचे लेखन समीक्षक डॉ.राजेन्द्र मुंढे हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.