file photo 
नागपूर

गुड न्यूज : शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळतील पुस्तके

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून बालभारतीकडे ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते आठवीच्या 1 लाख 59 हजार 881 विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. लॉकडाउन उघडताच तालुकास्तरावर पुस्तकांचा पुरवठा होणार असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध होणार आहेत. 

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे धोरण आहे. त्यानुसार जि. प.च्या शाळांनी बालभारतीच्या वेबसाईटला भेट देऊन पटसंख्येनुसार ही नोंदणी करावयाची होती. नागपूर जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविण्यात आली. तालुकास्तरावरुन ऑनलाइन पद्धतीने वर्ष 2018-2019च्या युडायसनुसार वर्ग, विषय, विद्यार्थीनिहाय नोंदणी करण्यात आली. शाळा भरलेल्या यूडीआयएसई डाटानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत 89370 विद्यार्थी, सहावी ते आठवीपर्यंत 70 हजार 311 अशा एकूण 1 लाख 59 हजार 881 विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली.

जि. प. माध्यमिक शिक्षण विभाग नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पुस्तके उपलब्ध करून देणार आहे. पुस्तके लवकरात लवकर मिळावीत, यासाठी जिल्हास्तरातून ब्लॉकस्तरावर ही पुस्तके रवाना होतील. तेथून ती शाळांनी प्राप्त करावयाची आहे. कुठलाही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहणार नाही. 
विशेष म्हणजे, राज्यस्तरावरून बालभारतीकडे पुस्तके तयार असल्याचे सांगण्यात येते. यासोबतच राज्य स्तरावरूनच पुरवठाधारकही मंजूर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: १४ किमी सायकल प्रवास ते चेन्नईकडून पदार्पण! शिक्षामित्र असलेल्या बापाच्या लेकाचा IPL प्रवास सुरू, कोण आहे प्रशांत वीर?

सुनील तावडे यांच्या लेकीने घेतलेला लग्नाआधीच सासरी राहण्याचा निर्णय; 'हे' होतं कारण, म्हणाले- तिची सासू...

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

SCROLL FOR NEXT