Both sisters died of illness and malnutrition Nagpur crime news 
नागपूर

‘त्या’ दोन्ही बहिणींचा आजारपण व कुपोषणाने मृत्यू; अनेक दिवसांपासून बंद घरात आढळले होते कुजलेले मृतदेह

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) : बंद घरात बुधवारी (ता. ६) अविवाहित दोन बहिणीचे मृतदेह मिळाले होते. त्या दोन्ही बहिणींचा मृत्यू आजारपण व कुपोषणाने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाळओळी नंबर २ येथे एका बंद घरात पद्मा नागोराव लवटे (वय ६०) व कल्पना नागोराव लवटे (वय ५०) या बुधवारी दुपारी एकच्या सुमारास मृतावस्थेत आढळल्या. शेजाऱ्यांनी लगेच जुनी कामठी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पलंगावर कल्पना नागोराव लवटे (५०), पलंगाच्या खाली जमिनीवर पद्मा नागोराव लवटे (६०) या दोघींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आले.

दोन्ही कुजलेल्या मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. शेजाऱ्यांकडून माहिती घेतली असता पद्मा व कल्पना या दोघी सख्या बहिणी असून उच्चशिक्षित होत्या. दहा वर्षांपूर्वी त्यांचे आई-वडील मरण पावले. त्यानंतर त्यांनी धुनीभांडी व मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होत्या.

परिस्थिती हलाखीची असताना शेजारी व इतर कोणत्याही नातेवाइकांकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता दोन्ही बहिणी घराचे दार बंद करून घरात राहत होत्या. शेजारी व इतर कोणाशी त्यांचा संबंध नव्हता. म्हणून शेजाऱ्यांनी त्या दोन्ही बहिणी घरातच असतील असे वाटत होते. अविवाहित बहिणींचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने शहरात सर्वत्र खळबळ उडाली.

पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास कामठी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. एस. के. वाघमारे यांनी शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले. नातेवाईकांनी राणीतलाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार केले.

धाकट्या बहिणींचे बयाण

मृत पद्मा व कल्पनाच्या धाकट्या बहिणी सुनिता नरेंद्र कंटाळे (वय ३५, रा. इंदोर मध्यप्रदेश), अर्चना विजय इल्लपुरकर (वय ४०, रा. बुलढाणा) गुरुवारी दुपारी कामठी उपजिल्हा रुग्णालयात हजर झाल्या. त्यांना ठाणेदार विजय मालचे यांनी पद्मा व कल्पना संदर्भात माहिती विचारली असता कल्पना थोडी मानसिक रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

पद्मा उच्चशिक्षित होती. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होती. दहा वर्षापूर्वी आईवडील मरण पावले, तेव्हापासून आम्ही कामठीला आलो नाहीत. त्यांची भेट सुद्धा झाली नाही. रेखाच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. जी. पाटील करीत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT