नागपूर

दुर्दैव! मित्रांसह पोहायला गेलेला मुलाचा बुडून मृत्यू

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) : घरी न सांगता मित्रांसह (friends) पोहायला गेलेल्या मुलाचा कामठी तालुक्यातील नेरी शिवारातील कन्हान नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव विशाल जोगिंदर मोहने (१५, रा. बिडगाव, पारडी, नागपूर) असे आहे. (boy who went swimming with friends drowned)

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडगाव, गुलाल कंपनीमागे, पारडी, नागपूर येथे राहणारा विशाल जोगींदर मोहने (१५) यांच्यासह तिघे मित्र बुधवारी दुपारी एक वाजता घरी आई-वडिलांनी मनाई केल्यावरसुद्धा न सांगता कामठी तालुक्यातील नेरी शिवारातील कन्हान नदीवर मौजमस्ती करायला आले. नदीपात्रात पोहायला उतरले. जवळपास तीन ते चार तास ते पाण्यात मौजमस्ती करीत असताना पाण्याच्या अंदाज न आल्याने विशाल जोगींदर मोहने हा पाण्यात बुडाला.

सोबतच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने त्यांनी घाबरून घरच्या लोकांना कळविले. घटनेची माहिती मिळताच वडिलांसह परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले व त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो मिळून न आल्याने रात्री उशिरा पोलिसांना सूचना देण्यात आली. सूचना मिळताच नवीन कामठी येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अंधार झाल्याने शोधकार्य होऊ शकले नाही. आज सकाळी मुलाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

ट्रॅक्टरवरून पडल्याने बालकाचा मृत्यू

पारशिवनीः वाघोडा विट भट्टयावर विटा तयार करण्यासाठी धनुसकुमार रोहित पारधी पत्नी व दोन मुलांसह विटा तयार करण्याच्या कामासाठी आले होते. मंगळवारी पत्नी व पारधी हे कामावर होते. दोन मुले विटभट्ट्यावरील घरी होते. एवढ्यात त्यांचा सात वर्षीय मुलगा दुर्गेश हा पाण्याच्या ट्रॅक्टरवरुन खाली पडून जखमी अवस्थेत गवणा रस्त्यावर पडला असल्याचे कळले. लगेच दुर्गेशचे आईवडील घटनास्थळाकडे धावले असता त्यांचा मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेला आढळला.

पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एमएच ४० एल ३००९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचालकाने पाणी वाहून नेताना लापरवाही व भरधाव ट्रॅक्टर चालवल्याने मुलगा खाली पडून ट्रॅक्टरच्या चाकात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार दुर्गेशच्या वडिलांनी पारशिवनी पोलिसात दाखल केली. पुढील कारवाई पारशिवनी पोलिस करीत आहेत.

(boy who went swimming with friends drowned)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

SCROLL FOR NEXT