Break to salary hikes of seven officers and workers in Nagpur ZP  
नागपूर

सकाळ इम्पॅक्ट: सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची थांबणार वेतनवाढ! आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकरण भोवलं 

निलेश डोये

नागपूर : विभागीय चौकशी सुरू असलेल्या शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करणे शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे. या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारीसह सात जणांची वेतनवाढ थांबविण्यात येणार असून तशी नोटीसही बजावण्यात आल्याची माहिती आहे. अर्ज करणाऱ्या शिक्षकावरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली.

जि.प.कडून प्राथमिक गटातून १३ व माध्यमिक गटातून २ अशा १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक या पुरस्काराने गौरविण्यात येते. आदर्श पुरस्कारसाठी शिक्षकाची निवड करताना गैरव्यवहाराच्या आरोपासोबत विभागीय चौकशी सुरू नसणे महत्त्वाचे निकष आहे. परंतु या निकषाला डावलून विभागीय चौकशी सुरू असलेल्या एका शिक्षकाची आदर्श पुरस्करासाठी निवड केली. 

रामटेकच्या गट शिक्षणाधिकारी संगिता तभाने, दोन विस्तार अधिकारी सुशील बन्सोड, हिरामन कुमरे, कक्ष अधिकारी अपुर्वा घटाटे, अधीक्षक छाया वांदिले, केंद्र प्रमुख, संबंधित शिक्षकासह सात जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. शिक्षकाला जाहीर करण्यात आलेला पुरस्कार थांबविण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढवली. कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या सर्वांनी स्पष्टकरण सादर केले. 

विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षकांनी याकरता गट शिक्षण अधिकाऱ्यास जबाबदार ठरवले. निवड प्रक्रियेतील तिघांवर कारवाई करीत इतरांना तंबी देण्याची शिफारस काही अधिकाऱ्यांनी केली. परंतु चुकीला माफी नाही, या धोरणावर असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सातही जणांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेतला. तशी नोटीसही संबंधिताना देण्यात आली. यामुळे शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT