Break the wall of the State Workers Insurance Scheme office 
नागपूर

इमारत वापरण्याजोगी नसल्याचा शेरा देऊनही बिनधास्त वावर; भिंतीला तडे, तरी कामकाज सुरूच

केवल जीवनतारे

नागपूर : नऊ महिन्यांपूर्वी मेडिकलच्या त्वचारोग विभागासमोरचा सज्जा कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेतून कोणीही धडा घेतला नाही. त्यानंतर काही दिवसांतच मेयोत एका वॉर्डात छताचा काही भाग कोसळला होता. यानंतर वैद्यकीय रुग्णालयाच्या जुन्या इमारतींमधील धोकादायक असो वा नसो, सज्जे पाडण्याचा सपाटा सार्वजनिक बांधकाम विभागाने लावला होता.

मात्र, दहा वर्षांपूर्वी राज्य कामगार विमा योजनेचे इमामवाडा येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील मेडिकल स्टोअर वापरण्यायोग्य नसल्याची सूचना देऊनही या विभागाला शहाणपण सुचले नाही. जीर्ण बांधकाम न पाडताच मेडिकल स्टोअर सुरू आहे. याच इमारतीत औषधसाठा ठेवला जातो. विशेष असे की, तडे गेलेल्या या इमारतीत कर्मचारी दिवसभर असतात. एखादी अऩुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल, हा प्रश्न उभा ठाकला आहे.

राज्य कामगार विमा योजनेच्या या वैद्यकीय प्रशासकीय कार्यालयातील मेडिकल स्टोअरचे २००९ स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी ही इमारत वापरण्यायोग्य नसल्याचा शेरा देण्यात आला होता. मात्र, येथील कार्यालय प्रमुखांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. यापूर्वी एकदा धोका झाला होता. परंतु, पुन्हा डागडुजी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

येथील मध्यवर्ती मेडिकल स्टोअरमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात भिंतीला तडे गेले आहेत. ही भिंत कधी पडेल याचा नेम नाही. या ठिकाणी कर्मचारी दिवसभर कामकाज करीत आहेत. याशिवाय मध्यवर्ती स्टोअर असल्यामुळे विदर्भातील कामगार विमा योजनेच्या डिस्पेन्सरीमधील कर्मचारी औषधसाठा घेण्यासाठी येथे येत असल्याचेही सांगण्यात आले.

प्रशासनाचा हलगर्जीपणा जिवावर बेतू नये

२००९ मध्ये झालेल्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये चाचण्यांसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली होती. तसे पत्र राज्य कामगार विमा योजनेच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयला सादर करण्यात आले होते. त्यात इमारतीच्या भिंती तसेच काही भागाचे काँक्रीट कमकुवत झाल्याचे सांगण्यात आले होते. येथील मेडिकल स्टोअर हलविण्याची गरज होती. परंतु, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मागील दहा वर्षांपासून या इमारतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रशासनाचा हा हलगर्जीपणा कोणाच्या जिवावर बेतू नये एवढेच.


कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सांगण्यात येईल
इमारत वापरण्याजोगी नाही, असे पत्र देण्यात आले होते. सध्या येथील कर्मचाऱ्यांना सेंट्रल मेडिकल स्टोअर हलविण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. येथे कर्मचारी बसतात. ही एक जोखीम आहे. कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सांगण्यात येईल. तसेच संबंधितानाही कळविण्यात येईल.
-डॉ. ज्ञानेश्‍वर हुलके, प्रशासन अधिकारी राज्य कामगार विमा योजना, इमामवाडा 

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT