नागपूर

राष्ट्रवादी म्हणजे आपल्याच विचारांचा पक्ष; फारशी गटबाजी नसल्याने नाराजांचा गोतावळा करणार प्रवेश

राजेश चरपे

नागपूर : मोदींच्या लाटेत भाजपमध्ये गेलेले आणि अडगळीत पडलेले विविध पक्षातील आजी-माजी नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यात काही बसप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचाही समावेश असल्याचे समजते.

उत्तर नागपूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात काही नगरसेवकांनी निवेदनाच्या बहाण्याने गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार प्रफुल पटेल यांची भेट घेऊन तसे संकेतही दिले आहेत. गटबाजीमुळे काँग्रेसचे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत. विकास ठाकरे यांचे नाव घेतले तर पालकमंत्री नितीन राऊत विचारत नाही. राऊतांच्या कार्यक्रमात गेले तर ठाकरे दूर सारतात अशी अवस्था काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे आपल्याच विचारांचा पक्ष, तुलनेत फारशी गटबाजी नसल्याने त्यांना राष्ट्रवादी सुरक्षित वाटत आहे.

मोदी लाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापैकी काही पराभूत झाले. तत्कालीन भाजपचे शहराध्यक्ष बदलले. आता त्यांना कोणी विचारत नाही. यात राष्ट्रवादीच्या दक्षिण नागपूरमधील एका युवा नेत्याचाही समावेश आहे. तेसुद्धा स्वगृही परतणार आहेत.

भाजपचे १०८ नगरसेवक निवडूण आल्यानंतर बाहेरून आलेल्यांना कोणी विचारेनासे झाले आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांना कुठलेच पद दिले नाही. कुठल्यास समितीत सामावून घेतले नाही. भाजपमधील असा नाराजांचा गोतावळा राष्ट्रवादीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. एक आणि दोन फेब्रुवारीला शहर आणि ग्रामीणमधील सर्व सहा जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत वैयक्तिक संवाद साधणार आहे. रेशीमबागेतील जैन कलार भवन येथे सकाळी दहा वाजतापासून बैठक सत्र आयोजित केले आहे.

त्यातच कार्यकारिणीची बैठकसुद्धा घेण्यात येणार आहे. यात पाटील महापालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि इच्छुकांचाही आढावा घेणार आहेत.  सोमवारी पूर्व, पश्चिम, उत्तर तर दोन फेब्रवारीला द.प., मध्य आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत जयंत पाटील चर्चा करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT