नागपूर

बसपचा हत्ती जिल्हा परिषदेत घुसणार; कोण येणार पायदळी?

राजेश चरपे

नागपूर : सार्वत्रिक निवडणुकीत ब्रेक घेणाऱ्या बहुजन समाज पार्टीने (Bahujan Samaj Party) नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पोटनिवडणूक संपूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय (Zilla Parishad and Panchayat Samiti elections) घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना अधिक सावध रहावे लागणार आहे. लोकसभा आणि विधानसभेत तिसऱ्या क्रमांकाची मते बसपच्या उमेदवारांना मिळाली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून बसप भविष्यातील निवडणुकीची तयारी करणार असल्याचे समजते. (BSP-will-contest-Zilla-Parishad-and-Panchayat-Samiti-elections)

नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ आणि पंचायत समितीच्या ३१ जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मागील निवडणुकीत बसपने जिल्हा परिषद निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ओबीसी व अनुसूचित जाती जमातीच्या मतांचा विभाजन टळले होते. याचा थेट फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झाला होता. दोन्ही काँग्रेसने मिळून जिल्हा परिषदेतील भाजपची दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आणली होती.

न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण काढूण घेतले आहे. त्याचा फटका काँग्रेसच्या सात, राष्ट्रवादी व भाजपच्या प्रत्येकी चार आणि शेकापच्या एका सदस्यला बसला. सदस्यत्वर रद्द झालेल्या सर्व जागांवर पोटनिवडणूक होऊ घातली आहे. सुरुवातीला बसप लढणार नाही, असे संकेत दिले जात होते.

मात्र, गुरुवारी बसपचे प्रदेश प्रभारी वीरसिंग, प्रमोद रैना, प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने, सरसिटणीस नागोराव जयकर, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला. रामटेक लोकसभा मतदारसंघात बसपची बऱ्यापैकी व्होटबँक आहे. लोकसभा आणि विधानसभेत तिसऱ्या क्रमांकाची मते बसपच्या उमेदवारांना मिळाली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून बसप भविष्यातील निवडणुकीची तयारी करणार असल्याचे समजते.

उघडलेले खाते बंद झाले

बसपने यापूर्वी २०१२ची जिल्हा परिषदेची निवडणूक लढली होती. पुष्पा वाघाडे यांनी जिल्ह्यात बसपला खाते उघडूण दिले होते. त्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीसुद्धा होत्या. त्यानंतर वाघाडे यांनी शिवसेनेते प्रवेश केला.

पोटनिवडणुकीत सक्षम उमेदवार दिले जातील. दोन दिवसांत उमेदवार निश्चित करून उमेदवारी दाखल केली जाईल. आमच्याशिवाय जिल्हा परिषदेत कुठल्याही पक्षाला सत्ता स्थापन करता येणार नाही, इतके उमेदवार निश्चितच निवडूण येतील. प्रदेश पातळीवर सर्व उमेदवारांना पक्षातर्फे बळ दिले जाणार आहे.
- नागोराव जयकर, सरचिटणीस, बसपा

(BSP-will-contest-Zilla-Parishad-and-Panchayat-Samiti-elections)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT