CAIT Presents Over Ten Thousand Rakhis For Indian Soldiers to Defence Minister 
नागपूर

क्‍या बात है! सैनिकांना पाठवल्या साडे दहा हजार राख्या 

राजेश रामपूरकर

 
नागपूर ः ऑगस्टपासून नोव्हेंबर महिन्यात येणारे राखीपासून दिवाळीपर्यंतचे सर्व सण भारतीय संस्कृतीनुसार साजरे करावेत. केवळ भारतीय वस्तूंची विक्री करून चिनी उत्पादकांना झटका देण्याचा विक्रेत्यांचा संकल्प आहे. ग्राहकही चिनच्या भूमिकेमुळे त्यांच्या उत्पादनाला नकार देत आहे. भारतीय सैनिकांप्रति असलेल्या नागरिकांच्या प्रेमापोटी अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) सीमेवरील सैनिकांसाठी दहा हजार 400 स्वदेशी राखी पाठविल्या आहेत . 


चिनी उत्पादनांचा बहिष्कार करीत सर्व सण पूर्णतः स्वदेशी वस्तूंसह साजरे करण्याचे आवाहन संपूर्ण देशभरात करण्यात येत आहे. गेल्यावर्षी तीन महिन्यांच्या या सणांमध्ये 20 हजार कोटी रुपयांच्या वस्तू देशात आयात झाल्या होत्या. व्यापाऱ्यांच्या संकल्पामुळे आता हा व्यवसाय भारतीयांना मिळणार आहे. रक्षाबंधनाला कुणीही चिनी राख्या वापरू नये, असे आवाहन महासंघाने केले आहे. चिनी राख्यांवर बंदी घातल्यास त्या देशाचे चार हजार कोटींचे नुकसान होणार आहे. 

देशात रक्षाबंधनानिमित्ताने सहा हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यापैकी केवळ चिनी राख्यांची बाजारपेठ चार हजार कोटींची आहे. शिवाय चीनमधून फोम, कागद, राखी धागा, मोती आणि राखीवरील सजावटीचे सामानही आयात होते. मात्र, यंदा भारत-चीनमधील तणावाच्या स्थितीमुळे ही आयात न करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. 

वेगवेगळ्या राज्यांमधील आपल्या सभासदांना शहरांमधील स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या संस्था, महिला बचत गट, अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने राख्या तयार करण्यास पुढाकार घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. या माध्यमातून त्यांना आर्थिक मदतही होईल. तसेच, पूर्णपणे भारतीय राखी बनवण्याचा हेतूही साध्य होईल, असे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी म्हटले आहे. 

कॅटने स्वदेशी राख्यांसाठी स्वतःहून पुढाकार घेतला असून नागपूर, दिल्ली, भोपाळ, ग्वाल्हेर, भुवनेश्‍वर, कानपूर, सुरत, तीनसुकीया, कोल्हापूर, जम्मू येथे स्थानिक उत्पादक, कलाकारांच्या मदतीने राख्या तयार केलेल्या आहेत. सीमेवर तैनात सैनिकांसाठी त्यातील दहा हजार 400 राख्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना संघटनेतर्फे नुकत्याच दिल्या असे भरतीया म्हणाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Charter Planes Safety : लहान चार्टर्ड विमानांमध्ये प्रवास करणे खरोखर धोकादायक आहे का?

Vani News : नरहरी झिरवाळ यांच्या आठवणींतील दादा…..

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

सोलापुरातील धक्कादायक घटना! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा; पीडितेच्या बहिणीमुळे धक्कादायक प्रकार उघडकीस

Ajit Pawar: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोक; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकातही बदल

SCROLL FOR NEXT